Bhor Ram Janmotsav: भोरचा श्री रामजन्मोत्सव; 300 वर्षांची वैभवशाली परंपरा आजही कायम

राजवाड्यात पारंपरिक सोहळा; इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम
Ram
RamPudhari
Published on
Updated on

अर्जुन खोपडे

भोर: चैत्र शुद्ध अष्टमीपासून सुरू होणारा भोरचा श्री रामजन्मोत्सव हा धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अद्वितीय संगम मानला जातो. सुमारे 300 वर्षांहून अधिक वैभवशाली परंपरा लाभलेल्या या उत्सवाला आजही तेवढ्याच उत्साहात साजरे केले जाते. विशेष म्हणजे, ऐतिहासिक राजवाड्यात हा सोहळा गेली सुमारे 150 वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे.

Ram
Pune Illegal Parking Metro: मेट्रोखालीच वाहनतळ! कसबा पेठेत बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

भोर संस्थानचे संस्थापक श्रीमंत शंकराजी नारायण यांचे पुत्र नारोपंत यांना इ. स. 1720 मध्ये पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील अंताजी मोरेश्वर खळदकर यांनी श्री रामाची मूर्ती दिली. ही मूर्ती भोरजवळील ओढ्याकाठी प्राप्त झाल्याने त्या ठिकाणाला ‌‘राम ओढा‌’ असे नाव पडले. यापूर्वी पंतसचिवांकडे श्रीरामनवमी उत्सव घरगुती स्वरूपात साजरा होत होता; मात्र मूर्ती प्राप्त झाल्यानंतर हा उत्सव सार्वजनिक झाला.

Ram
NAFIS System India: ‘नाफीस’ प्रणालीकडे पुणे पोलिसांचा कल; गुन्हेगारांची माहिती एकाच क्लिकवर

भोर येथे राजधानी स्थापन झाल्यानंतर आणि राजवाडा उभारल्यानंतर उत्सवाला अधिक भव्य स्वरूप प्राप्त झाले. चैत्र शुद्ध अष्टमीला मूर्ती मिळाल्याच्या परंपरेनुसार अष्टमी ते दशमी या तीन दिवसांत उत्सव साजरा केला जातो. या काळात राजवाड्यातील सभामंडप आकर्षक सजावटीने नटलेला असतो. पारंपरिक झुंबर, हंड्या आणि रोषणाईमुळे संपूर्ण परिसर खुलून दिसतो.

Ram
Pune Student Death: पुणे कृषी महाविद्यालयात विजेचा धक्का; विद्यार्थ्याचा मृत्यू, आंदोलन पेटले

रामनवमी हा उत्सवाचा प्रमुख दिवस असतो. पूर्वी संस्थानकाळात हत्ती, घोडे, स्वार आणि लवाजम्यासह श्री रामाची मूर्ती सोनाराकडून सवाद्य मिरवणुकीत राजवाड्यात आणली जात असे. विधिपूर्वक पूजा-अर्चेनंतर सभामंडपात श्री रामनामाचा जप सुरू राहतो. दुपारी बारा वाजता पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पंतसचिवांच्या हस्ते पाळणा जोजवला जातो आणि रामजन्माचा सोहळा होतो. या वेळी तोफांची सलामी, बंदुकींच्या फैरी आणि वाद्यांच्या गजरात संपूर्ण वातावरण दुमदुमून जात असे.

Ram
PNG Gas Pipeline Rules: पीएनजी गॅसला चालना; पाइपलाइनसाठी केंद्राचे नवे नियम लागू

उत्सवानंतर आरती, सुंठवडा आणि पानसुपारीचा कार्यक्रम होतो. त्यानंतर बाह्मण भोजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा पार पडते. पूर्वी बाहेरगावाहून येणाऱ्या शास्त्री, कीर्तनकार, गवई, नर्तक आणि इतर कलावंतांना दरबारातून बिदागी देऊन सन्मानित केले जात असे. इ. स. 1923 पासून भोजनव्यवस्था सुरू करण्यात आली. या उत्सवासाठी राजगड व पवनमावळ परिसरातील गावांच्या उत्पन्नातून खर्चाची तरतूद करण्यात आली होती. आजही पंतसचिवांचे वंशज आणि भोरकर नागरिक ही परंपरा मोठ्या उत्साहात जपताना दिसतात. महाराष्ट्रातील रामजन्मोत्सवांमध्ये भोरचा उत्सव विशेष मानाचा मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news