Pune Cantonment FSI: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये दोन एफएसआयला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी; २,५०० मालमत्तांना दिलासा

दशकभरापासून रखडलेल्या जुन्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; लवकरच अधिसूचना
Pune Cantonment Board
Pune Cantonment BoardPudhari
Published on
Updated on

विनय पुराणिक

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील (पीसीबी) नागरी भागात दोन चटई निर्देशांक (एफएसआय) करण्याच्या निर्णयाला अखेर संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबत अधिसूचना जाहीर केली जाणार असून, गेल्या दशकभरापासून जुन्या घरांच्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

Pune Cantonment Board
Chandannagar Document Registration: बोगस दस्तनोंदणीच्या आरोपाने चंदननगरमध्ये खळबळ; वकिलांचे आंदोलन, अधिकाऱ्याचा कारभार काढला

कॅन्टोन्मेंट भाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत केंद्र आणि राज्यपातळीवर कार्यवाही सुरू आहे. त्यातच कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक एफएसआय असताना २०१७ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून दोन एफएसआय करावा, असा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. याबाबत कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांकडून होणाऱ्या बांधकामासाठी नव्या बांधकाम नियमावलीचे (बायलॉज) प्रारूप तयार करण्यात आले होते.

Pune Cantonment Board
Maharashtra Agriculture Employees Protest: प्रस्तावित कृषी आकृतीबंधाला राज्यभर विरोध; कृषी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून निषेध

त्यानुसार नागरी भाग, संरक्षण मालमत्ता, उद्योग क्षेत्र, शिक्षण संस्था, हॉस्पिटल यांच्या क्षेत्रफळानुसार एफएसआयची मागणी करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून, संरक्षण मालमत्ता महासंचलनालयाकडून दोन एफएसआयला मंजुरी देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली.

Pune Cantonment Board
Pune DJ Free Ganeshotsav: सोलापूरच्या धर्तीवर पुण्यातही ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव करा; सर्वपक्षीय नेत्यांना साद

संरक्षण विभागाकडून लवकरच याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, या निर्णयामुळे कॅन्टोन्मेंटमधील सुमारे २५०० मालमत्तांना दिलासा मिळणार आहे. तसेच, जुन्या घरांच्या पुनर्विकासासह नव्या बांधकामांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी स्पष्ट केले.

Pune Cantonment Board
Pune Ganesh Visarjan Noise Pollution: बैठका होतात, नियम ठरतात; तरीही पुण्यात गणेश विसर्जनाचा ‘ध्वनीदणदणाट’ कायम!

कॅन्टोन्मेंट बोर्डातील जुन्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतींच्या दृष्टीने दोन ‘एफएसआय’चा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. अधिसूचना प्रसिद्ध होताच कार्यवाहीला सुरुवात करण्यात येईल.

विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कटक मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news