पुण्यातील व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

पुण्यातील व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांना गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील बाफना मोटर्स प्रा. लि. च्या संचालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रविराज रियालिटीचे मालक रवींद्र नौपातलाल साकला (रा. ढोले पाटील रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाफना मोटर्स (मुंबई) चे संचालक सुमतीप्रसाद मिश्रीलाल बाफना (62 रा. मरीन ड्राईव्ह, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रवींद्र साकला यांचा रविराज रिअ‍ॅलिटी नावाने बांधकाम व्यवसाय आहे. तर आरोपी बाफना हेदेखील व्यावसायिक आहेत. त्यामुळे साकला आणि बाफना यांची ओळख होती. मार्च 2021 मध्ये बाफना हे रवींद्र साकला यांच्या पुण्यातील ढोले पाटील रोडवरील कार्यालयात आले. त्यांनी साकला यांना कंपनीसाठी आणि रियल इस्टेटकरीता पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. तसेच बाफना यांनी साकला यांना जर आमच्या कंपनीत पैसे गुंतवले तर चांगला नफा देण्याचे आश्वासन बाफना यांनी दिले.

साकला यांनी बाफना यांच्या कंपनीत 2 कोटी 60 लाख रुपये चेक आणि आरटीएसद्वारे तर 45 लाख रुपये रोख दिले होते. त्यानंतर बाफना यांनी साकला यांना टाळाटाळ कण्यास सुरुवात केली. साकला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज केला. त्यानंतर बाफना यांनी 55 लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर टाळाटाळ केली. बाफना यांनी नफा अथवा जागा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नेवसे करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news