Pune BJP NCP Alliance: प्रभाग समिती निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र; काँग्रेसला धक्का

अध्यक्षपद वाटपावरून बदलली राजकीय समीकरणे; राष्ट्रवादीला वर्षभरासाठी अध्यक्षपद देण्याचा निर्णय
BJP vs Congress
BJP vs CongressPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग््रेासला गुंडाळले आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून या दोन्ही पक्षांत मतभेद झाले असतानाही भाजपने राष्ट्रवादीला एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद वर्षभरासाठी देऊन या निवडणुकीत राष्ट्रवादीला बरोबर घेऊन काँग््रेासला धक्का दिला आहे.

BJP vs Congress
Narayangaon Kesari Wrestling: ‘नारायणगाव केसरी’ किताब सिकंदर शेखचा; तीन लाखांचे बक्षीस पटकावले

महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी दि. 21 एप्रिलला निवडणूक होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करताना राष्ट्रवादीला प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू नये, यासाठी भाजपने प्रशासकीय रचनेत हस्तक्षेप करीत प्रभाग क्र. 1 व 2 नगर रस्ता लोहगाव क्षेत्रीय कार्यालयाला जोडले. त्यामुळे येरवडा वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदापासून राष्ट्रवादीला वंचित राहावे लागले आहे.

BJP vs Congress
Pune Zilla Parishad CBSE Schools: पुणे जिल्हा परिषदेकडून सर्व 13 तालुक्यांत CBSE शाळा सुरू करण्याचा निर्णय

या रचनेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाने महापालिकेकडून अहवाल मागविला आहे. त्यानंतर अद्याप ही रचना दुरुस्त करण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग््रेासला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग््रेास व राष्ट्रवादी यांची प्रत्येकी चार व भाजपची चार, असे संख्याबळ होऊन अध्यक्षपद थेट चिठ्ठीवर निवडण्याची वेळ आली असती.

BJP vs Congress
Pune School Stationary Action: खासगी शाळांना इशारा: पुस्तके व गणवेश खरेदीस सक्ती केल्यास कारवाई

भाजपने हा धोका लक्षात घेऊन थेट राष्ट्रवादीची मनधरणी केली तसेच या क्षेत्रीय कार्यालयाचे पहिल्या वर्षाचे अध्यक्षपद थेट राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता राष्ट्रवादीला एका वर्षासाठी अध्यक्षपद मिळणार असले तरी येरवडा, वडगाव शेरी प्रभाग समितीचे अध्यक्षपद थेट पाच वर्षांसाठी सोडावे लागणार आहे.

BJP vs Congress
Pune Market Illegal Encroachment: पुणे बाजार समितीत G-56 जागांवर पुन्हा अनधिकृत व्यापार; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊन अर्ज दाखल केले आहेत. दिल्ली ते गल्ली आम्ही एकत्रच आहोत. प्रशासकीय रचनेत कोणताही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. क्षेत्रीय कार्यालये मोठी आहेत, त्या ठिकाणी नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून, त्यासाठी उपकेंद्र तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे.

गणेश बिडकर, सभागृहनेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news