Narayangaon Kesari Wrestling: ‘नारायणगाव केसरी’ किताब सिकंदर शेखचा; तीन लाखांचे बक्षीस पटकावले

अंतिम लढतीत निरु गुज्जरचा पराभव; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत रंगला भव्य आखाडा
Narayangaon Kesari Wrestling
Narayangaon Kesari WrestlingPudhari
Published on
Updated on

नारायणगाव : येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती आखाड्यात “नारायणगाव केसरी” हा मानाचा किताब महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पटकावला. अंतिम लढतीत त्याने भारत केसरी निरु गुज्जर याला चितपट करत विजेतेपद मिळवले. या विजयाबद्दल यात्रा समितीच्या वतीने त्याचा तीन लाख रुपयांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

Narayangaon Kesari Wrestling
Pune Zilla Parishad CBSE Schools: पुणे जिल्हा परिषदेकडून सर्व 13 तालुक्यांत CBSE शाळा सुरू करण्याचा निर्णय

ही रंगतदार कुस्ती निकाली लागताच उपस्थित कुस्ती शौकिनांनी टाळ्यांच्या कडकडाटात सिकंदर शेख यांचे जल्लोषात स्वागत केले. “मुक्ताबाई माते की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या प्रमुख कुस्तीसाठी आमदार शरद सोनवणे यांनी तीन लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. कुस्ती यात्रा समितीचे प्रमुख योगेश पाटे, संतोष खैरे यांच्या हस्ते लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आखाड्याचे पूजन करून कुस्त्यांना प्रारंभ झाला. रात्री साडेअकरापर्यंत सुमारे १०० कुस्त्या रंगल्या. देवस्थान ट्रस्टच्या वतीने लाल मातीचा आखाडा तयार करून स्टेडियमची उभारणी करण्यात आली होती.

Narayangaon Kesari Wrestling
Pune School Stationary Action: खासगी शाळांना इशारा: पुस्तके व गणवेश खरेदीस सक्ती केल्यास कारवाई

राज्यातील नामांकित पैलवानांनी यात सहभाग घेतला. या आखाड्यात विविध गटांतील कुस्त्यांमध्ये पंचवीस हजार, पंधरा हजार, अकरा हजार रुपयांच्या प्रत्येकी दहा कुस्त्या, तसेच तीन लाख, दीड लाख, एक लाख आणि ५१ हजार रुपयांच्या प्रमुख कुस्त्या पार पडल्या. विजेत्या पैलवानांना एकूण सुमारे १५ लाख रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले. महत्त्वाच्या कुस्त्यांमध्ये सुनील कोटगोंड याने बालाजी खरात याचा पराभव करून १ लाख ५१ हजार रुपयांची कुस्ती जिंकली. सागर देवकाते व शाहरुख खान यांच्यातील एक लाख रुपयांच्या कुस्तीत शाहरुख खान विजयी ठरला. तसेच ओंकार येलभर व अमोल दिंडे यांच्यातील ५१ हजार रुपयांच्या कुस्तीत अमोल दिंडे याने बाजी मारली. या सर्व कुस्त्या २० ते ४० मिनिटे रंगल्या.

Narayangaon Kesari Wrestling
Pune Market Illegal Encroachment: पुणे बाजार समितीत G-56 जागांवर पुन्हा अनधिकृत व्यापार; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या वेळी माजी आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके,अनिल मेहेर, सुजित खैरे, विश्वस्त प्रकाश पाटे, देवदत्त निकम, गणपत फुलवडे, गुलाबराव नेहरकर, यांच्या हस्ते प्रमुख कुस्त्या लावण्यात आल्या. इनाम वितरणाचे काम दादाभाऊ खैरे, विलास पाटे, राजाराम पाटे, मुरलीधर फुलसुंदर, संजय खैरे यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी योगेश पाटे, संतोष खैरे, एकनाथ शेटे, अशोक पाटेसंतोष वाजगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी आमदार अतुल बेनके आशाताई बुचके अनिल मेहर बाबू पाटे यांची भाषणे झाली. नारायणगावचा प्रसिद्ध कुस्तीचा आखाडा पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. पंच म्हणून अनिल गुंजाळ, अनिल मेहत्रे, एच. पी. नरसुडे यांनी काम पाहिले, तर समालोचन राजेश धायगुडे यांनी केले.

Narayangaon Kesari Wrestling
Pune Municipal Budget: पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महसूल वाढीसाठी समिती स्थापन

मागील वर्षी माझ्याकडून नारायणगावची यात्रा चुकली. मात्र यापुढे मला बोलवा अगर नका बोलवू परंतु दरवर्षी मी येणारच. नारायणगाव करांच्या प्रेमाने मी भारावून गेलो असून नारायणगावकर यांनी मला व्यक्तिगत दिलेल्या बक्षीसाची रक्कम मी जपून ठेवीन व पुढच्या वर्षी याच नोटा घेऊन नारायणगावच्या यात्रेत येऊन तुम्हाला त्या नोटा दाखवेल. नारायणगावकरांचे प्रेम मी कधीही विसरू शकत नाही.

सिकंदर शेख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news