Pune Bhusar Market Slowdown: पुणे भुसार बाजारात मंदी; खोबरे, शेंगदाण्याचे दर घसरले

उन्हाचा तडाखा आणि कमी मागणीचा परिणाम; धान्य व अत्यावश्यक वस्तूंचे दर स्थिर
Peanut
PeanutPudhari
Published on
Updated on

पुणे: कडाक्याच्या उन्हाचा तडाखा आणि सण-उत्सवांचा अभाव, या दुहेरी कारणांमुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या मंदीचे वातावरण निर्माण झाले असून, सलग दुसऱ्या आठवड्यात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने व्यवहारावर त्याचा थेट परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.

Peanut
Chakan Vegetable Market Rates: चाकण बाजारात विक्रमी आवक; भाजीपाल्याचे दर कायम तेजीत

वातावरणातील सतत बदल आणि वाढत्या तापमानामुळे भुसार माल लवकर खराब होऊ लागल्याने काही दिवसांपूर्वी गोटा खोबरा दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, वाढलेल्या दरामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने आता मागणी घटली असून, परिणामी खोबऱ्याच्या भावात किलोमागे सुमारे 40 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. शेंगदाणा बाजारातही अस्थिरता कायम असून, आठवडाभरापूर्वी किलोमागे 7 ते 8 रुपयांनी वाढ झाल्यानंतर अलिकडच्या दोन दिवसांत पुन्हा 3 ते 4 रुपयांनी दर घसरले आहेत.

Peanut
Pune Fish Price Rise: पुण्यात मासळीचे दर तेजीत; कमी आवकामुळे ग्राहकांना झळ

गुळाला बाजारात चांगली मागणी असली, तरी उसाच्या तुटवड्यामुळे अनेक गुऱ्हाळे बंद पडल्याने गुळाची आवक कमी झाली आहे. परिणामी, कमी पुरवठा असूनही मागणी टिकून असल्याने गुळाचे दर स्थिर राहिले आहेत. दरम्यान, युद्धामुळे संभाव्य टंचाई किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने नागरिकांनी यापूर्वीच धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठा केल्यामुळे सध्या बाजारात उठाव कमी झाला असून, धान्याचे दर स्थिर आहेत. याशिवाय मागणी व पुरवठ्यात समतोल राहिल्यामुळे साखर, खाद्यतेल, साबूदाणा, भगर, लाल मिरची आणि नारळ या अत्यावश्यक वस्तूंचे दरही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Peanut
Pune Railway Station Redevelopment: पुणे स्टेशन पुनर्विकासासाठी एसटी बसस्थानकाची जागा रेल्वेच्या ताब्यात?

घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4050-4070 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):-

शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2250-3100, सरकी तेल 2100-2500, सोयाबीन तेल 2150-2450, पामतेल 2150-2350, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4300, वनस्पती 1820-2300 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4150-5000, एच.एम.टी. कोलम 5300-5600, लचकारी कोलम 6100-6600, चिन्नोर 4500-5000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 7000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु. गूळ :- गूळ नं. 1 4600-4800, गूळ नं.2 4450-4550 गूळ नं.3 4300-4400, बॉक्स 4500-5500 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7650-7800, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु.

Peanut
Savitribai Phule University Salary Hike: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करार प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

कडधान्ये:-हरभरा 6000-6700, हुलगा 5200-5700, चवळी 7900-10500, मसूर 7400-8500, मूग 9500-9800, मटकी गावरान 9600-17000, मटकी पॉलिश 6800-7500, मटकी गुजरात 16000-16500, मटकी राजस्थान 6500-7500, मटकी सेलम 16000-18100, वाटाणा हिरवा 5400-6000, वाटाणा पांढरा 4900-5200, काबुली चणा 7400-11200 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13000-13500, सावा भगर 12500-13000 रु. गोटा खोबरे 3950-4100 रु. शेंगदाणा :- जाडा 11300-12800, स्पॅनिश11500-12500, घुंगरु 11000-12000 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, बेसन:- (50 किलोस) 3600-4250 रु. मिरची: काश्मीरी ढब्बी 6000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 24000-26000, खुडवा गुंटूर 12000-13000, खुडवा ब्याडगी 16000-18000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850, मद्रास 4600-4800, पालकोल जुना 2100-2300, सापसोल 3500-5000 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news