Pune Fish Price Rise: पुण्यात मासळीचे दर तेजीत; कमी आवकामुळे ग्राहकांना झळ

गणेश पेठ बाजारात पुरवठा घटला; मटण, चिकन आणि अंडी दर मात्र स्थिर
Fish
Fish Pudhari
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून पूर्णपणे मासेमारी बंद आहे. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळम येथून आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे भाव तेजीत आहेत. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Fish
Pune Railway Station Redevelopment: पुणे स्टेशन पुनर्विकासासाठी एसटी बसस्थानकाची जागा रेल्वेच्या ताब्यात?

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 19) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 600 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 15 टन इतकी आवक झाली होती.

Fish
Savitribai Phule University Salary Hike: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करार प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-800, मध्यम : 1400-1500, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 800-1000, सुरमई 800-1200, रावस : 800-1000, घोळ : 800-1000, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 400-450, भिंग : 400-450, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 900-1100, काळी : 300-400, ओले बोंबील : 350-450. कोळंबी : लहान : 250-360, मध्यम : 350-500, मोठी : 550-750, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-1000. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 450-500, तांबोशी : 550-650, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 250-300, शेवटे : 350-400, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-240, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 120-180, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1100 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 505, डझन 72, प्रतिनग 6.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news