Pune Bangladeshi Prostitution Raid: बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायात भाग पाडल्याप्रकरणी 5 जणांना अटक

महिलांना फसवून वेश्याव्यवसायात पाडण्यात आले, जनता बिल्डिंगवर पोलिसांनी छापा घालून पापा शेखसह 5 बांगलादेशी नागरिकांना पकडले
Prostitution Racket Pune
Prostitution Racket PunePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या ऑपरेशनध्ये, बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पाच बांगलादेशींना पोलिसांनी पकडले. त्यामध्ये चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Prostitution Racket Pune
Pune ACB Bribery Arrest: जिल्हा व्यवस्थापक व सहायक लेखा अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक

याप्रकरणी, ब्युटीपार्लर, टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगलादेशातून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या पापा शेख याच्यासह 4 जणांवर पोलिसांनी अनैतिक वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. बांगलादेशी एजंट मुल्ला, बाबू भय्या ऊर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (वय 26, रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ), घरमालकीण मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कुंटणखाना चालक भोपसिंग राजपूत याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गंगाधर जावळगी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Prostitution Racket Pune
Maharashtra Budget 2026: उच्चशिक्षण, कौशल्यविकास व रोजगारासाठी नवे उपक्रम

पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. त्यात पहिल्या मजल्यावर मूळच्या बांगलादेशातील चार महिला व एक पुरुष आढळून आले. भोपसिंग राजपूत हा कुंटणखाना चालवत होता. तो या महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता.

Prostitution Racket Pune
Maharashtra Budget 2026: पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांसाठी निधी आणि पायाभूत सुविधा

ग््रााहकांकडून आलेले पैसे स्वत:कडे ठेवत होता. घरमालकीण मीनाक्षी मेत्री हिला तो काही पैसे देत होता. या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना ब्युटी पार्लरमध्ये किंवा टेलरिंगचे कामात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन बांगलादेशी एजंट मुल्ला याने पुण्यात आणून पापा शेख याच्या हवाली केले होते. त्याने जबरदस्तीने पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना त्याचे ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले.

Prostitution Racket Pune
Maharashtra Budget 2026: सांस्कृतिक क्षेत्रासाठी स्वागतार्ह निर्णय, परंतु कलाकारांना अधिक निधीची गरज

कारवाईचा फास आवळला

यापूर्वीदेखील केलेल्या कारवाईत बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बांगलादेशी महिला आणि पुरुष वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या महिन्यात शहर पोलिसांनी किमान दोन वेळा नाकाबंदी करून बुधवार पेठेत छापामारी केली होती. त्या वेळी जवळपास 12 बांगलादेशी महिला आढळून आल्या होत्या. पापा शेख हा बुधवार पेठेत आणल्या जाणाऱ्या महिलांचा एजंट म्हणून काम करतो. गेल्या महिन्यातही त्याच्याविरुद्ध बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायाला लावण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news