

पुणे : शनिवारी महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो भीमसैनिक जमले असतानाच पुण्यातही ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त पुण्यातील नागरिकांनी पुणे महापालिकेच्या मनपाच्या विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आठवण सांगितली.
पुण्यातील भाजपचे नेते आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा बसवण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडला. 2021 मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अर्धकृती पुतळा सुपूर्त करण्यात आला होता.
पुणे महानगरपालिकेला स्थापन होऊन ७० वर्षे झाली असली, तरी महानगरपालिकेत आदरणीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नव्हता. ज्या महामानवाने आपल्याला राज्यघटना दिली त्या कार्याची कायम आठवण रहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुणे महापालिकेत उभारण्यात आला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, दलित-अदिवासींना न्याय दिला आणि सर्व समाजाला एकत्र ठेवून देशाच्या विकासासाठी संविधान तयार करण्याचे कार्य केले याची आठवण या पुतळ्यामुळे कायम राहील.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्हाधिकारी कचेरीसमोरील पुतळा हे लाखो लोकांचे श्रद्धा स्थान गर्दीच्या वेळी योग्य ती सोय नसल्याने दुरुनच दर्शन गेऊन अनेकांना जावे लागे. ऊन पावसापासून या पुतळ्याचे रक्षण व्हावे तसेच डॉ. बाबासाहेबांच्या व्यक्तीमताला साजेसे अशी रचना असलेली मेघडंबरी उभी करण्याचा निश्चय केला. अथक प्रयत्न व सतत पाठपुरावा करून मेघडंबरीचे काम पूर्णत्वाला नेले व लाखो लोकांच्या अभिनंदनास पात्र ठरलो याचे सर्वांगीण समाधान आहे.
गणेश बिडकर
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. हा पुतळा काहीसा उंचीवर असल्यामुळे या पुतळ्याला हार घालण्यासाठी शिडीचा वापर करावा लागत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्याची ही व्यवस्था सोयीस्कर नव्हती. या व्यवस्थेमुळे गैरसोयीचे प्रसंग टाळण्यासाठी गणेश बिडकर यांच्या प्रयत्नांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्यात आली.
ही मेघडंबरी उभारण्यासाठी तत्कालीन खासदार प्रदीप रावत यांनी पाच लाखांचा निधी दिला. ही मेघडंबरी उभारल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणाऱ्या नागरिकांची उत्तम सोय झाली. मेघडंबरीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि परिसराच्या सौदर्यांत भर पडली. या कामाच्या उद्घाटन प्रसंगी रा सु गवई उपस्थित होते व या कामाचे कौतुक केले होते.