ISIS module ATS investigation Pune: ‘पुणे मोड्युल’चा पुढील अध्याय फॉरेन्सिक अहवालावर ठरणार!

एटीएसकडून डिजीटल पुरावे तपासणीसाठी पाठवले; संशयित दहशतवाद्यांचा चेहरा लवकरच समोर येणार
ISIS module ATS investigation Pune
‘पुणे मोड्युल’चा पुढील अध्याय फॉरेन्सिक अहवालावर ठरणार!(File Photo)
Published on
Updated on

पुणे : पुण्यात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेला कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, डिजीटल पुरावे व आक्षेपार्ह लिखानाचा समावेश आहे. हे सर्व साहित्य न्यायवैद्यक प्रयोग शाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल हाती आल्यानंतर तसेच संशयांच्या गर्तेत असलेल्यांची चौकशी केल्यानंतर पुणे मोड्युलचा पुढील अध्याय ठरणार असून, संशयीत दहशतवाद्यांचा चेहरा समोर येणार असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Latest Pune News)

ISIS module ATS investigation Pune
Eknath Shinde in Pune: महायुतीत दंगा नको; उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले – गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही

इसिसला दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्या जाणाऱ्या प्रकरणात व राष्ट्रविरोधी कारवाई केल्याप्रकरणात शहरात बुधवारी (दि.8) मध्यरात्री बारा ते गुरूवारी रात्री आठ वाजेपर्यंत एटीएस छापेमारी केली. साताऱ्यातील साडीच्या दुकानावर दरोडा टाकून चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम संशयित इसिसच्या दहशतवाद्यांनी बॉम्बचे (आयईडी - इप्रूव्हाईज एक्सप्लोझीव्ह डिव्हाईस) साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. एप्रिल 2023 मध्ये टाकलेला हा दरोडा म्हणजे दहशतवादी कारवायांच्या निधी उभारणीसाठी केलेले कृत्य असल्याचे तपासातून समोर आले होते.

ISIS module ATS investigation Pune
Warulwadi flat theft: बंद फ्लॅट फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास

त्याच अनुषंगाने एटीएसने 7/2023 हा गुन्हा नव्याने दाखल केला होता. त्याच गुन्ह्याचा तपास पुणे एटीएस करत आहे. पुण्यातील इसिस मोड्युल प्रकरणात सहभागी असलेले दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम शफीउमा खान ऊर्फ इबाहीम ऊर्फ प्रिन्स (वय 32, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ छोटु (वय 27, रा. कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश), जुल्फिकार अली बरोडावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (वय 44, बोरीवली, राहुर पडगा, भिवंडी, ठाणे, मूळ रा. बरोडा, गुजरात) आणि जून महिन्यात तलाह लियाकत अली खान (वय 37, रा. कोंढवा) याला मुंबईतील कारागृहातून साताऱ्यातील दरोड्यात सहभाग असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती.

ISIS module ATS investigation Pune
Ladki Bahin Yojana eKYC: ई-केवायसीत अडथळे; लाडक्या बहिणी वैतागल्या

तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पुण्यात 2023 मध्ये कोथरूड या ठिकाणी जे आंतकवादी चोरी करताना पकडले गेले. ज्या प्रकरणात सुरुवातीला कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नंतर तपासात बेकायदेशीर हालचालीच्या अनुषंगाने माहिती समोर आली. त्यानंतर गुन्हा एटीएसकडे 6/2023 यानुसार नोंद करण्यात आला होता. पुढे या गुन्ह्यांचे आंतराष्ट्रीय कनेक्शन उघड झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास एनआयएकडून सुरू असून याप्रकरणात एक मुख्य आरोपपत्रा बरोबर दोन पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आली आहे. यालाच पुढे पुणे मोड्युल म्हणून संबोधले गेले.

ISIS module ATS investigation Pune
Pune Zilla Parishad Reservation 2025: पुणे जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीची घोषणा; जाणून घ्या कोणता गट कोणासाठी राखीव

त्या प्रकरणात राष्ट्रविरोधी कृत्य केल्याप्रकरणात व इसिस या दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारल्याप्रकरणात 13 जणांना अटक होऊन त्यांच्यावर आरोपत्र दाखल झाले आहे. त्यातीलच आरोपींचा सातारा दरोड्यात सहभाग आढळल्याने त्यांना एटीएस तपास करत असलेल्या 7/2023 या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्यामुळे नुकत्याच केलेल्या कारवाईत महत्वपूर्ण माहिती व कनेक्शन एटीएसच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात नव्याने गुन्हा देखील होण्याची शक्यता आहे. एटीएसचे पुणे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व तपास सुरू आहे.

ISIS module ATS investigation Pune
Saswad Nagarparishad election: सासवड नगराध्यक्षपदासाठी आतापासून ‘लॉबिंग’; आरक्षणाने इच्छुकांना धक्का

पुढील कारवाईचा वाढणार वेग

कारवाई बाबात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी पहाटेपासून आमची पुणे पोलिसांच्या मदतीने ही 19 ठिकाणी छापेमारी झाली. यावेळी सर्च ॲण्ड सील ऑपरेशन राबविले गेले. यामध्ये डिजीटल साहित्य, पेन ड्राईव्ह, हार्डडिक्स, संशयित लिटरेचर, डायऱ्या आणि नोट्‌‍स हस्तगत केल्या गेल्या. या जप्त मुद्दे मालाचे विश्लेषण करण्यासाठी हा मुद्देमाल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाईचा वेग वाढणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news