Pune School Holiday: रेड अलर्टमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांना आज सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय; अंगणवाड्यांसह सर्व शाळा बंद, मात्र शिक्षक-कर्मचारी उपस्थित राहणार
Red Alert School Closed
Red Alert School ClosedPudhari
Published on
Updated on

पुणे: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील सर्व शाळांना मंगळवार (दि.७) जुलैला अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे, सुरुवातीला केवळ घाटमाथ्यावरील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Red Alert School Closed
Khed Flood Incident: खेड तालुक्यात दुर्दैवी घटना; ओढ्याच्या पुरात 30 वर्षीय तरुण दुचाकीसह वाहून गेला

जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासांत अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Red Alert School Closed
Railway Pet Van Service: रेल्वेच्या ‘पेट व्हॅन’ सेवेला प्रवाशांची पसंती; दोन वर्षांत 3 हजारांहून अधिक पाळीव प्राण्यांची वाहतूक

या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महापालिका शाळा, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित संस्था, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच सर्व अंगणवाड्या मंगळवारी बंद राहणार आहेत.

Red Alert School Closed
Maharashtra TET Online Exam: टीईटी परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? आयबीपीएसच्या भूमिकेमुळे संभ्रम कायम

शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सोपविण्यात येणारी सर्व कामे तत्काळ पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Red Alert School Closed
Pune Government Job Fraud: शासकीय नोकरीचे आमिष; पुण्यात १५ लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा

महानगरपालिका प्रशासनाने सर्व शाळांनी या आदेशाची तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचना आणि प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करून अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news