Khed Flood Incident: खेड तालुक्यात दुर्दैवी घटना; ओढ्याच्या पुरात 30 वर्षीय तरुण दुचाकीसह वाहून गेला

रेटवडी परिसरात समीर जाधव वाहून गेला; शोधमोहीम सुरू, पावसामुळे ओढे-नाले धोकादायक स्थितीत
Khed Flood Incident
Khed Flood IncidentPudhari
Published on
Updated on

राजगुरूनगर: रेटवडी (ता. खेड) येथे ओढ्यावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ३० वर्षीय तरुण दुचाकीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ६) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. समीर भिमाजी जाधव (वय ३०, रा. रेटवडी, खालची ठाकरवाडी, ता. खेड) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

Khed Flood Incident
Railway Pet Van Service: रेल्वेच्या ‘पेट व्हॅन’ सेवेला प्रवाशांची पसंती; दोन वर्षांत 3 हजारांहून अधिक पाळीव प्राण्यांची वाहतूक

खेड तालुक्यात रविवारी रात्रीपासून सतत पावसाच्या सरी कोसळत असल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेटवडी येथील एका दुकानात खालची ठाकरवाडी येथून समीर जाधव दुचाकीवर श्रीखंड व इतर किराणा सामान घेण्यासाठी आला होता.

Khed Flood Incident
Maharashtra TET Online Exam: टीईटी परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? आयबीपीएसच्या भूमिकेमुळे संभ्रम कायम

घरी परत जाताना सतारकावस्तीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बंगलावस्ती येथील ओढ्याला आलेल्या पुरात तो अडकला. पाण्याचा वेग ओळखता न आल्याने तो दुचाकीसह वाहून गेला. दुचाकी मात्र रस्त्यावरील दगडांमध्ये अडकल्याने सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने समीरचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news