Pune Airport Passenger Growth: पुणेकरांचा डबल धमाका! विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली; उड्डाणे आणि प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या २८ हजारांहून अधिक; देशांतर्गत प्रवाशांमध्येही लक्षणीय वाढ, पुणे बनले जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र.
Pune Airport Passenger Growth
Pune Airport Passenger GrowthPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे विमानतळावर यंदा प्रवासी आणि विमानोड्डाणांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करण्यात डबल धमाका केला आहे. विमानतळ प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे समोर आले आहे.

Pune Airport Passenger Growth
Pune Fruit Market Price: डाळिंब, कलिंगड, खरबूज महागले, पण 'हा' स्वस्त! पहा आजचे पुणे फळबाजार भाव

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, यंदा प्रवासी आणि विमानोड्डाणांमध्ये दुप्पट वाढ नोंदवली आहे. या वाढीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे दुपटीने वाढली आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी आंतरराष्ट्रीय सोबतच देशांतर्गत प्रवाशांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. सुट्ट्या, व्यावसायिक दौरे, पर्यटन आणि शिक्षण अशा विविध कारणांमुळे पुणेकरांचा विमान प्रवासाकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Pune Airport Passenger Growth
Pune Market Yard Vegetable Price: पुण्याच्या मार्केट यार्डात १०० ट्रकमधून भाजीपाला दाखल! बटाटा, मटारसह अनेक भाज्या स्वस्त; 'या' एका भाजीचा दर मात्र वाढला

असे वाढले आंतरराष्ट्रीय प्रवाशी...

गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये 12,877 प्रवाशांनी पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. तर सप्टेंबर 2025 मध्ये 22,308 प्रवाशांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवास केला. तसेच, ऑक्टोबर 2024 मध्ये 14,238 प्रवाशांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवास केला. तर ऑक्टोबर 2025 मध्ये 28,258 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याची नोंद पुणे विमानतळ प्रशासनाने केली. यावरून पुणे विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांसोबतच प्रवाशी संख्या वाढल्याचे समोर आले आहे. प्रत्येक महिन्यात अशीच स्थिती असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे वाढले देशांतर्गत प्रवासी...

सप्टेंबर 2024 मध्ये 8,23,296 प्रवाशांनी तर सप्टेंबर 2025 मध्ये 8,50,214 प्रवाशांनी पुण्यातून देशांतर्गत प्रवास केला. तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये 8,44,991 प्रवाशांनी तर ऑक्टोबर 2025 मध्ये 8,89,264 प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केल्याची नोंद पुणे विमानतळ प्रशासनाने केली. यावरून पुणे विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांसोबतच प्रवाशी संख्या देखील वाढत असल्याचे दिसून आले.

Pune Airport Passenger Growth
Pune Election Campaign Strategies: निवडणुकीत मतांसाठी काय वाट्टेल ते! 'पैसा-बिर्याणी' पासून ते 'कुकरच्या झाकणां'पर्यंत; वाचा प्रचाराच्या नाना तऱ्हा...

अशी वाढली आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे...

सप्टेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय 109 विमानांची उड्डाणे झाली होती. तर यंदा सप्टेंबर 2025 मध्ये 202 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये 105 विमानांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण केले होते, तर यंदा ऑक्टोबरमध्ये 222 विमानांचे आंतरराष्ट्रीय उड्डाण झाले. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या प्रत्येक महिन्यांची तुलना केली तर यंदा आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांची संख्या दुप्पटच असल्याचे समोर आले आहे.

Pune Airport Passenger Growth
PMC Ward 41 Election: पुण्याच्या प्रभाग ४१ मध्ये महायुती vs महाआघाडी! भाजप आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी, 'काटे की टक्कर'

अशी वाढली देशांतर्गत प्रवासी संख्या...

गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये देशांतर्गत 5,473 विमानांची उड्डाणे झाली होती. तर यंदा सप्टेंबरमध्ये 5,702 देशांतर्गत विमानांची उड्डाणे झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये 5,698 विमानांनी देशांतर्गत उड्डाण केले होते, तर यंदा ऑक्टोबरमध्ये 5,986 विमानांचे देशांतर्गत उड्डाण झाले. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या प्रत्येक महिन्यांची तुलना केली, तर यंदा देशांतर्गत विमानोड्डाणांची संख्या अधिकअसल्याचे समोर आले आहे.

Pune Airport Passenger Growth
PMC Ward 41 Development: पुण्याच्या प्रभाग ४१ मधील समाविष्ट गावे अजूनही 'पाणी' आणि 'सोई'विना! सर्वांगीण विकासाचे आव्हान कायम

पुणे विमानतळावर झालेली प्रवाशी आणि विमानोड्डाणांची दुप्पट वाढ आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत झालेली दुपटीने वाढ हे दर्शवते की, पुणे हे आता केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. पुणेकरांनी दाखवलेला हा विश्वास खूप मोलाचा आहे. या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आम्ही विमानतळावरील सुविधांचा विस्तार आणि सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news