

पुणे : राज्यातील डाळिंबाचा हंगाम संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटक, गुजरात येथून डाळींबाची आवक होत आहे. परराज्यातील डाळिंब राज्यातील डाळिंबाच्या तुलनेत दर्जेदार नाहीत.
मात्र, बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने डाळिंबाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे उत्पादन रोडावल्याने कलिंगड आणि खरबूजाची आवक घटली आहे. मात्र, मागणी जास्त असल्याने या फळांच्या भावत किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरूवारनंतर पेरूला मागणी घटली आहे. परिणामी, त्याच्या वीस किलोच्या क्रेटसमागे शंभर रुपयांनी घसरण झाली आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 30) मोसंबी 70 ते 80 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 30 ते 35 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, खरबूज 8 ते 9 टेम्पो, चिकू 2 हजार गोणी, पेरू 1000 ते 1200 हजार क्रेट, अननस 6 ट्रक, बोरे 400 ते 450 पोती, गोल्डन सीताफळ 15 ते 20 टन तर गावरान सीताफळाची 1 ते 2 टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबू (प्रतिगोणी) : 100-250, मोसंबी : (3 डझन) : 120-320, (4 डझन) : 50-160, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : 80-250, आरक्ता : 40-80, गणेश : 5-30, कलिंगड : 15-30, खरबूज : 25- 30, पपई : 8-20,
चिकू (दहा किलो) : 100-600, पेरू (20 किलो) : 300-400, अननस (1 डझन) : 100-600, गोल्डन सीताफळ (1 किलो) : 5-25, गावरान सीताफळ (1 किलो) : 20-150, बोरे (10 किलो) : चमेली 270-300, चेकनट 800-1000, चण्यामण्या 750-800. सफरचंद : काश्मीर (14 ते 16 किलो) : 1000-1800.