Pune Illegal Injection Sale: पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; पाच जण अटकेत, ५० मेफिवान इंजेक्शन जप्त

आंबेगाव पोलिसांची कात्रज-दत्तनगर रस्त्यावर कारवाई; शरीरसौष्ठव व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची अवैध विक्री उघडकीस
MD Drugs
MD DrugsPudhari
Published on
Updated on

पुणे: इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा प्रकार आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मेफिवान या औषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त केल्या आहेत.

MD Drugs
Kesanand Solid Waste Management Project: केसनंद ग्रामपंचायतीत कचऱ्याचे आंदोलन; २.११ कोटींच्या घनकचरा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर संताप

अथर्व इंद्रजित शिंदे (वय २४, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६,रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंंबेगाव), पीयूष गणेश भरम (वय २६, रा. कचरावत चाळ, आंबेगाव), लक्ष्मण परमेश्वर माने (वय १९, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MD Drugs
SPPU New Courses: पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सात नवे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू; ड्रोन, ईव्ही, रोबोटिक्सला प्राधान्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-दत्तनगर रस्त्यावर २४ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास इंजेक्शनची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले.

MD Drugs
Savitribai Phule Pune University Students Issues: पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या रोहित पवारांसमोर; आरोग्य केंद्र, वसतिगृह आणि मानधनावर संताप

आरोपींकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली. तेव्हा त्यात इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. या इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या पिशवीत मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या (मेफीवन) ५० बाटल्या सापडल्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही जण या इंजेक्शनचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असून, या इंजेक्शनचा वापर काही जण नशेसाठी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MD Drugs
Dharmendra Pradhan Resignation Celebration: ‘नीट’ आंदोलनाने सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला; रोहित पवारांचा दावा

या इंजेक्शनची बेकायदा जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. न्यायालयाने आरोपींनी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक चांगदेव सजगणे, सहायक निरीक्षक स्वाती देवधर, उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे, अजय कामठे, सुभाष माेरे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news