Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा वाढता विळखा; चार महिन्यांत २२ रुग्ण, नगर रोड-वडगाव शेरी सर्वाधिक हॉटस्पॉट

मान्सूननंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; जून-जुलैतच १८ रुग्णांची नोंद, साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढल्याची चिंता
Mosquito
MosquitoPudhari
Published on
Updated on

पुणे: मान्सूनचे आगमन होताच शहरात किटकजन्य आजारांनी डोके वर काढले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात डेंग्यूचे तब्‍बल २२ बाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, जून आणि जुलै या अवघ्या दीड महिन्यात १८ रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार नगर रोड-वडगाव शेरी, कोथरूड आणि औंध-बाणेर या भागांत डेंग्यूचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळत आहे.

Mosquito
Pune Illegal Injection Sale: पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; पाच जण अटकेत, ५० मेफिवान इंजेक्शन जप्त

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, एप्रिलमध्ये कसबा-विश्रामबागवाडा आणि भवानी पेठ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

Mosquito
Kesanand Solid Waste Management Project: केसनंद ग्रामपंचायतीत कचऱ्याचे आंदोलन; २.११ कोटींच्या घनकचरा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर संताप

मे महिन्यात रुग्णसंख्या शून्य होती. परंतु, पावसाला सुरुवात होताच जून महिन्यात अचानक १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर जुलैच्या पहिल्या १५ दिवसांतच आठ रुग्णांचे निदान झाले आहे. एकूण २२ रुग्णांपैकी ७२ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण केवळ तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नोंदवले गेले आहेत.

Mosquito
SPPU New Courses: पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सात नवे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू; ड्रोन, ईव्ही, रोबोटिक्सला प्राधान्य

क्षेत्रीय कार्यालयांप्रमाणे रुग्‍ण

  • नगर रोड - वडगाव शेरी : ७ रुग्ण

  • कोथरूड : ५ रुग्ण

  • औंध-बाणेर : ४ रुग्ण

  • कोंढवा-येवलेवाडी : २ रुग्ण

  • ढोले पाटील रोड, घोले रोड-शिवाजीनगर, कसबा-विश्रामबागवाडा आणि भवानी पेठ प्रत्‍येकी एक रुग्‍ण

Mosquito
Savitribai Phule Pune University Students Issues: पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या रोहित पवारांसमोर; आरोग्य केंद्र, वसतिगृह आणि मानधनावर संताप

वडगाव शेरीत सर्वाधिक रुग्‍ण

पुणे महापालिकेच्या नगर रोड-वडगाव शेरी या भागात सर्वाधिक सात रुग्‍ण डेंग्‍यूचे आढळून आले आहेत, तर येरवडा-कळस धानोरी, धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मुंढवा, केशवनगर, वानवडी-रामटेकडी आणि बिबवेवाडी या उर्वरित भागांत सध्या एकही रुग्ण आढळलेला नाही.

साचलेले पाणी ठरतेय धोक्याचे कारण

पावसाळ्यात विविध ठिकाणी तुंबणारे पाणी, गृहनिर्माण संस्थांच्या आवारात साचलेली पाण्याची डबकी आणि बांधकाम क्षेत्रांवरील अस्वच्छता डासांच्या पैदाशीसाठी पोषक ठरत आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्यामुळे महापालिकेने किटकप्रतिबंधक धूर फवारणी व तपासणी मोहीम तीव्र करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news