Talegaon Railway Station: तळेगावमध्ये नवीन रेल्वे मालधक्का; पुणे औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना

चाकण-तळेगाव परिसरातील उद्योगांना दिलासा; पुणे विभागातील 13 जुन्या मालधक्क्यांचा पुनर्विकासही रेल्वेकडून हाती घेण्यात आला आहे
Railway
RailwayPudhari
Published on
Updated on

पुणे: मावळ भागातील औद्योगिक पट्टा असलेल्या तळेगाव परिसरात रेल्वेच्या पुणे विभागाकडून नवीन ‍ शेड (मालधक्का) उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या नवीन प्रकल्पामुळे पुणे विभागातील रेल्वे मालवाहतुकीचा वेग वाढणार असून व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक औद्योगिक कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Railway
MahaRERA Recovery: महारेराच्या वसुली प्रक्रियेला गती नाही; घर खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले

तळेगाव आणि चाकण परिसरात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आणि इतर उद्योग आहेत. नवीन ‍ शेडमुळे या कंपन्यांना आपला कच्चा माल, पेट्रोलियम पदार्थ, साखर तसेच इतर वस्तू देशभरात पोहचविणे सोपे होणार आहे. परिणामी, पुणे परिसरातून होणाऱ्या मालाच्या आयात-निर्यातीला मोठी चालना मिळून रेल्वेच्या महसुलातही चांगली वाढ होईल.

Railway
Deccan Queen: ‘दख्खनची राणी’चा 97 वा वाढदिवस; पुणे-मुंबईच्या भावनिक नात्याचा ऐतिहासिक उत्सव

13 जुन्या ‍ शेडचा होणार पुनर्विकास

नवीन शेड उभारण्यासोबतच पुणे विभागातील सध्या कार्यरत असलेल्या 13 जुन्या ‍ शेडचा पुनर्विकास करण्याचे कामही रेल्वेने हाती घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने सासवड रोड, चिंचवड, बारामती, फुरसुंगी, लोणी, गुरमार्केट (कोल्हापूर), सांगली, मिरज, सातारा, कराड, लोणंद, कोपरगाव आणि श्रीगोंदा या ‍ शेडचा समावेश आहे.

Railway
National Teacher Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; 133 शिक्षकांचा गौरव

या पुनर्विकासामुळे जुन्या शेडची माल चढवण्याची आणि उतरवण्याची क्षमता वाढणार असून, मालगाड्यांचा प्रवास सुनिश्चित केला जाईल. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात वाढ करण्यासाठी स्वतंत्र मालगाड्यांचे नियोजन रेल्वे करीत आहे.

Railway
MGNREGA Fruit Plantation: मनरेगातून 50 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट; शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा आधार

पुणे विभागातील मालवाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी आणि त्याला अधिक चालना देण्यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागाकडून तळेगाव येथे नवीन ‍ शेड उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या नवीन ‍ शेडमुळे पुणे विभागातील मालवाहतुकीला आणि पर्यायाने स्थानिक उद्योगांना आणखी गती मिळणार आहे. तसेच, विभागातील अन्य ‍ शेडच्या पुनर्विकासाचे देखील काम सुरू केले आहे.

राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news