Pune Air Pollution: पुण्याची हवा दिल्लीपेक्षाही प्रदूषित; भोसरीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४२७ वर

दिवाळीनंतरही फटाक्यांचे प्रदूषण कायम; वाहनांच्या धुरामुळे शिवाजीनगर, निगडी परिसरातील हवेची गुणवत्ता खालावली
Air Pollution
Air PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीतील प्रदूषण अजूनही हवेत असून, त्यात आता वाहन प्रदूषणाची भर पडत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांतील हवेची गुणवत्ता अतिप्रदूषित गटात गेली आहे. गुरुवारी शिवाजीनगर येथील हवेची गुणवत्ता २५०, तर भोसरी येथील हवा गुणवत्तेचा निर्देशांक तब्बल ४२७ मायक्रोग्रॅम प्रतिक्युबीक चौरस मीटर इतका होता.

Air Pollution
Pune Cleanliness Ranking: स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला मोठा धक्का; राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतून शहर बाहेर

दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता या पाचही महानगरांतील हवेची गुणवत्ता आयआयटीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) ही संस्था मोजते. यंदा दिवाळीत फटक्यांचे प्रदूषण पुणे शहरात सर्वाधिक मोजले गेले. दिवाळी संपताच या प्रदूषणात आणखी वाढ होताना दिसत आहे. कारण वाहनांची वर्दळ वाढल्याने इंधन ज्वलनातून तयार होणारे प्रदूषण वाढले आहे.

Air Pollution
Pune Biodiversity Garden: पुण्यातील ओसाड टेकडी बनली जैवविविधतेचे नंदनवन; २३ हजार वृक्षांचे संवर्धन

पुण्याची हवा दिल्लीपेक्षाही खराब

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता गुरुवारी ३२० मायक्रो ग्रॅम प्रतिचौरस क्युबिक मीटर इतकी होती, तर पुण्यातील भोसरीचा हवा निर्देशांक तब्बल ४२७ वर गेला होता. त्यापाठोपाठ शिवाजीनगर २५० आणि निगडी २१४ इतका होता.

Air Pollution
Pune Crime : कोथरूडमध्ये सराईत गुन्हेगार 'लाल्या येवले'ची कोयत्याने निर्घृण हत्या; थरारक CCTV फुटेज समोर

धूलिकणांसह कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण वाढले

शहराच्या हवेत सूक्ष्म धुलिकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) चे प्रमाण खूप जास्त वाढले असून, गुरुवारी भोसरी येथे सर्वाधक हवा खराब असल्याची नोंद आयआयटीएम संस्थेने दिलेल्या हवा निर्देशांकाच्या पोर्टलवर गणली गेली.

Air Pollution
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर एका वाक्यात उत्तर; म्हणाल्या, 'जशी वेळ येईल...'

भोसरीच्या हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही खराब म्हणजे ४२७ इतकी, तर दिल्लीचा निर्देशांक ३२० इतका होता. शहरात धूलिकणांसह कार्बन मोनॉऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.