Pune Crime : कोथरूडमध्ये सराईत गुन्हेगार 'लाल्या येवले'ची कोयत्याने निर्घृण हत्या; थरारक CCTV फुटेज समोर

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी घडली रक्तरंजित ही घटना
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात पूर्ववैमनस्यातून एका २७ वर्षीय तरुणाची तलवार, कोयते आणि लोखंडी हत्यारांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रकाश ऊर्फ लाल्या येवले असे मृत तरुणाचे नाव असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. दरम्यान, या संपूर्ण थरारक घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आले असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली. रात्रीच्या वेळी प्रकाश येवले हा सुतारदरा परिसरातून जात असताना हल्लेखोरांनी त्याला अडवले. पूर्ववैमनस्यातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक धारदार शस्त्रे, लोखंडी हत्यारे आणि लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला चढवला. आरोपींनी त्याच्यावर सपासप वार करत बेदम मारहाण केली.

या भीषण हल्ल्यात प्रकाश येवले गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यावेळी गस्तीवर असलेल्या कोथरूड पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी घोषित केले.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.