Pune Road Tender Controversy: पुण्यात खड्डे बुजवण्याच्या २५ कोटींच्या निविदांवरून राजकारण तापले; ‘रिंग’चा आरोप

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचे गंभीर आरोप; पात्र-अपात्र ठेकेदारांच्या फेरफाराची चौकशी करण्याची मागणी
Road Tender Controversy
Road Tender ControversyPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील खड्डे बुजवण्यासाठी काढण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या तीन निविदांवरून महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. या निविदांमध्ये ठेकेदारांची 'रिंग' करून कामे वाटून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला. या कथित प्रकारामागे महापालिकेतील पदाधिकारी जबाबदार असल्याचा दावा करताना शिंदे यांनी थेट महापौरांवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले.

Road Tender Controversy
Pune Road Tender Cancelled: पुण्यात ७५ कोटींची वादग्रस्त रस्ते निविदा रद्द; आयुक्तांचा मोठा निर्णय

२५ कोटींची कामे तीन निविदांमध्ये विभागून ठेकेदारांना देण्याचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. पहिल्या दोन निविदांमध्ये कामांची कथित विभागणी झाली; मात्र, तिसऱ्या निविदेवेळी 'रिंग' फुटल्याने संबंधितांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून हा प्रकार बाहेर आल्याचा दावा त्यांनी केला. पात्र ठेकेदाराला अपात्र आणि अपात्र ठेकेदाराला पात्र करण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय तसेच आर्थिक दबाव आणत आहेत.

Road Tender Controversy
Shravan To Diwali Festivals 2026: श्रावणापासून सणांची पर्वणी; गणेशोत्सव, नवरात्र अन् दिवाळीचा जल्लोष

विशेष म्हणजे, काही अधिकाऱ्यांना महापौरांच्या बंगल्यावर बोलावून तेथे ठेकेदाराकडून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना दमदाटी केल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला. २६ जुलैच्या या कथित बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून ते सार्वजनिक करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली. दरम्यान, महापालिका प्रशासनाची भूमिकाही त्यांनी संशयाच्या भोवऱ्यात आणली. आयुक्तांनी तिन्ही निविदा रद्द करण्याचे सांगितले असतानाही त्या मान्यतेसाठी पाठवल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यामुळे प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Road Tender Controversy
Baramati Woman Death Case: विवाह ठरलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू; प्रियकराविरोधात बारामतीत गुन्हा

खड्डे बुजवण्याच्या कामासाठी आलेल्या ठेकेदारांची पात्रता पारदर्शकपणे तपासावी, सर्व पात्र ठेकेदारांच्या निविदा खुल्या कराव्यात आणि सर्वांत कमी दराची (एल १) निविदा स्वीकारावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. कथित गैरप्रकार सिद्ध झाल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

Road Tender Controversy
Shirur Woman Missing: ‘ब्लाऊज घेऊन येते’ म्हणत घराबाहेर पडली; पाच दिवसांनी भीमा नदीत आढळला महिलेचा मृतदेह

एकाच ठेकेदाराला कामे

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी निविदांमधील पात्रता निकषांवरही प्रश्न उपस्थित केले. एका ठेकेदाराच्या प्लांटची क्षमता आणि स्थानाबाबत कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, कोथरूड आणि मुंढवा पुलांच्या कामांसाठी एकाच ठेकेदाराला आणि वेगवेगळ्या कन्सल्टंटमार्फत कामे मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून या संबंधांचीही चौकशी करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news