Maharashtra 11th admission: अकरावी प्रवेश ऑनलाइन; या कागदपत्रांची आवश्यकता भासणार

education news in marathi: केंद्रीय प्रवेश प्रक्रिया लागू; मेरिटनुसार प्रवेश, पसंतीक्रमाची सुविधा उपलब्ध
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, राज्यातील सर्व राज्य मंडळांशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश ऑनलाइन केले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यक कागदपत्रे काढून ठेवावीत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले आहे.

Admission
Maharashtra ITI Daksh Project: पुण्यातील आयटीआय ‘दक्ष’ प्रकल्पात; कौशल्य विकासाला नवी चालना

गतवर्षी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली होती. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक पारदर्शकता व सुलभता मिळावी, यासाठी ही प्रणाली लागू केलेली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून अर्ज भरणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार म्हणजेच मेरिटनुसार राबवली जाणार आहे.

Admission
Temghar Dam Project: 'राजकारणी- एजंटांच्या संगनमतातून भूखंड हडपले', पुण्यात आणखी एक घोटाळा उघडकीस येणार?

कॅप व कोटा अशा दोन्ही पद्धतींनी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती शाखा, उपलब्ध जागा इत्यादी ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. प्रवेश प्रक्रिया राबविताना प्रथमतः विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यात प्रवेश अर्जाचा पहिला भाग व त्याची पडताळणी केली जाईल. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड करता येईल.

Admission
Pune Lohgaon Illegal Construction: पुण्यात अनधिकृत बांधकामांवरून संताप; लोहगाव प्रकरणाने महापालिका सभागृह तापले

त्यासाठी एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेश फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या नियमानुसार सर्व आरक्षणे लागू राहतील तसेच इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा याचाही समावेश असेल.

Admission
Sushma Andhare: पुण्यात सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्ला; महिला आरक्षणावरून राजकीय वाद

या कागदपत्रांची आवश्यकता भासणार

अकरावी प्रवेशासाठी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, प्रकल्पग््रास्त प्रमाणपत्र, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांचा बदली आदेश व रुजू अहवाल, संरक्षण दल किंवा माजी सैनिकांच्या मुलांसाठी आवश्यक प्रमाणपत्र, क्रीडापटू असल्यास जिल्हा क्रीडाधिकारी यांचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थी असल्यास महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news