Pudhari Rise Up Athletics: ‘पुढारी राईज अप’ महिला ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजल लिगडे, मृणाली कांबळे सुवर्णपदक विजेत्या

पुण्यात 2 हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग; विविध वयोगटांत दमदार कामगिरी
Pudhari Rise Up Athletics
Pudhari Rise Up AthleticsPudhari
Published on
Updated on

पुणे: कै. बाबूराव सणस मैदानावर सुरू असलेल्या ‌‘पुढारी राईज अप‌’ महिला ॲथलेटिक्स स्पर्धेच्या 13 वर्षांखालील 80 मीटर धावणे या गटात तेजल लिगडे हिने, तर गोळाफेक प्रकारात मृणाली कांबळे हिने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील खेळाडूंनी आपले क्रीडा-कौशल्य पणाला लावत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेचा शुक्रवारी समारोप झाला. स्पर्धेत पुणे शहर, पुणे ग््राामीण आणि पिंपरी-चिंचवड येथून 2 हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. 80 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक आणि लांब उडी अशा विविध क्रीडाप्रकारांत खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.

Pudhari Rise Up Athletics
Ashwini Pacharne: वाफगाव-रेटवडी (ता. खेड) गटात अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांनी केले मतदान

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश बागवे, ज्येष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक बाप्टिस्ट डिसुझा, बीव्हीजीचे डॉ अमरदीप मेहेत्रे, आंतरराष्ट्रीय पंच चंद्रशेखर कुदळे, दै. ‌‘पुढारी‌’च्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख संतोष धुमाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 50 मीटर धावणे 9 वर्षांखालील मुलींच्या गटात कल्याणी स्कूलच्या मायरा यादव हिने 8.6 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. याच गटात वृद्धी नाग हिने 8.8 सेकंद वेळेसह दुसरे स्थान मिळवले. 200 मीटर धावणे प्रकारात 11 वर्षांखालील गटात मिशिका चोरचोबे हिने 32.4 सेकंदात अंतर कापत अव्वलस्थान मिळवले. तर, 13 वर्षांखालील गटात अन्विता बोर्डे हिने 30.6 सेकंद वेळेसह बाजी मारली. 600 मीटर धावणे प्रकारात मध्यम पल्ल्याच्या या शर्यतीत खेळाडूंचा कस लागला. 15 वर्षांखालील गटात अदिती भाद हिने 1:50.6 अशा उत्कृष्ट वेळेसह विजय मिळवला. तर, 17 वर्षांखालील गटात अदिती हरगुडे हिने 1:52.1 वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्ण पटकावले.

Pudhari Rise Up Athletics
Rohit Pawar: आमच्या मनात शंका... १० तारखेला विमान अपघाताबाबत अन् १२ ला विलिनीकरणाबात रोहित पवार मोठा गौप्यस्फोट करणार,

4 बाय 100 मीटर रिले शर्यतीमध्ये बीएसएमच्या संघाने सांघिक ताळमेळ दाखवत 59.9 सेकंदांत शर्यत जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत आर्यन वर्ल्ड स्कूलने 60.5 सेकंद वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक, तर कटारिया हायस्कूलने 62.5 सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला. 4 बाय 50 मीटर 11 वर्षांखालील रिले स्पर्धेत अभिनव शाळेच्या संघाने 34.0 सेकंदांत शर्यत पूर्ण करत विजेतेपद मिळवले. आर्यन वर्ल्ड स्कूल आणि द कल्याणी स्कूल यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे समनव्य हर्षल निकम यांनी, तर मुख्य पंच लोईस रॉड्रिक्स यांनी काम पाहिले. या स्पर्धेला पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.

Pudhari Rise Up Athletics
Pune Property Registration: पुणे जिल्ह्यात मालमत्ता व्यवहारांची तेजी; 10 महिन्यांत 1.91 लाख दस्त नोंदणी

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : मुली (13 वर्षांखालील) - 80 मीटर धावणे : प्रथम : तेजल लिगडे - 11.4 सेकंद, द्वितीय : स्पृहा पांगारे - 11.6 सेकंद. तृतीय : सायशा गाडरे - 11.7 सेकंद. मुली (13 वर्षांखालील) - गोळाफेक : प्रथम : मृणाली एस. कांबळे - 9.71 मीटर, द्वितीय : तनिष्का एस. जाधव - 8.93 मीटर, तृतीय: मृणाल एम. लुंकड - 8.90 मीटर. मुली (9 वर्षांखालील) - 100 मीटर धावणे : प्रथम : अर्णव जोशीलकर - 17.0 सेकंद, द्वितीय: सवी जेवलीकर - 17.7 सेकंद, तृतीय: वृत्ती नाग - 17.8 सेकंद. मुली (11 वर्षांखालील) - 80 मीटर धावणे : प्रथम : दुर्वा राऊत - 12.0 सेकंद, द्वितीय : प्रथा गायकवाड - 12.2 सेकंद, तृतीय : तनुजा पाठक - 12.6 सेकंद. मुली (11 वर्षांखालील) - उंच उडी : प्रथम : अन्वी दर्शन शेळके - 1.05 मीटर, द्वितीय : यशिका रविराज - 1.00 मीटर, तृतीय : मृगया जरंडे - 1.00 मीटर. मुली (9 वर्षांखालील) - लांब उडी : प्रथम : कायरा बर्हाटे - 1.84 मीटर, द्वितीय : प्रिहल गायकवाड - 1.80 मीटर, तृतीय : हर्षिता भंडारी - 1.73 मीटर.

Pudhari Rise Up Athletics
Pune Illegal Construction: नव्या एसओपीचा परिणाम: तीन दिवसांत 50 हून अधिक अनधिकृत बांधकामे उघड

दै. ‌‘पुढारी‌’ने केवळ मुली आणि महिलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ग््राामीण भागातील, तळागाळातील मुलींना यामुळे मोठी संधी मिळाली आहे. दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने सहा खेळ प्रकार घेत असून, त्यांनी त्यामध्ये बॉक्सिंग खेळाचाही समावेश करावा आणि त्या खेळातील मुलींना ही व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

अविनाश बागवे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना

दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित राईज अप ॲथलेटिक्स स्पर्धेत मुलींना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. एखाद्या माध्यम समूहातर्फे आयोजित मुलींचा एवढा मोठा सहभाग प्रथमच पाहत आहे. या स्पर्धा जिल्हापातळीवर न थांबता राज्यपातळीवर पोहोचावी.

चंद्रशेखर कुदळे, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स पंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news