Pune Illegal Construction: नव्या एसओपीचा परिणाम: तीन दिवसांत 50 हून अधिक अनधिकृत बांधकामे उघड

आयुक्तांच्या आदेशानंतर लोहगाव, खराडी, नगर रोड, कात्रज परिसरात कारवाईचा वेग; येत्या दिवसांत कठोर कारवाईचे संकेत
Construction
ConstructionPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत व्यवसायांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी लागू केलेल्या नव्या ‌‘एसओपी‌’चा (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) परिणाम अवघ्या काही दिवसांतच दिसून येऊ लागला आहे.

Construction
CTET Exam 2026: सीटीईटी परीक्षा 7 व 8 फेब्रुवारीला; हॉलतिकीट उपलब्ध

आयुक्तांच्या आदेशानंतर केवळ तीन दिवसांत क्षेत्रीय कार्यालयांतील कनिष्ठ अभियंत्यांनी लोहगाव, खराडी, नगर रोड आणि कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी परिसरात सुरू असलेली तसेच पूर्वी उभारलेली पन्नासहून अधिक अनधिकृत बांधकामे शोधून काढली असून, शहरभर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Construction
Pune Jilha Parishad Election 2026: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज मतदान

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी 20 जानेवारी रोजी अनधिकृत बांधकामे आणि व्यवसायांवर कारवाईबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी विहित कालमर्यादेत ठोस कारवाई होण्यासाठी सविस्तर ‌‘एसओपी‌’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या एसओपीनुसार क्षेत्रीय कार्यालयांतील कनिष्ठ अभियंत्यांवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील साईड व फंट मार्जिनमधील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे तसेच पदपथांवरील बेकायदा व्यवसायांचे दररोज सर्वेक्षण करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.

Construction
Pune Empty Flats: पुण्यात रिकाम्या फ्लॅट्सचा प्रश्न: गरजू नागरिकांची घरे मिळत नाहीत

कनिष्ठ अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल सहायक आयुक्तांच्या माध्यमातून बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावून, पोलिस विभाग व व्हेईकल डेपोच्या समन्वयाने विहित मुदतीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व कारवायांचा अंतिम अहवाल थेट महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. आयुक्तांनी या एसओपीनुसार तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच दोन ते तीन क्षेत्रीय कार्यालयांतील कनिष्ठ अभियंत्यांनी सुमारे पन्नास अनधिकृत बांधकामांचे फोटो, गुगल लोकेशन आणि जागामालकांची नावे संकलित करून अहवाल सादर केला आहे. प्रशासनाकडून सर्वच क्षेत्रीय कार्यालयांनी किमान महिनाभर प्रामाणिकपणे ही मोहीम राबविल्यास, हजारो प्रकरणे उघडकीस येऊ शकतील.

Construction
Election Code Violation Pune: आचारसंहिता भंग प्रकरणी पुण्यातील चार सहकारी संस्थांना नोटीस

दोन झोनल विभागांकडून अनधिकृत बांधकामांबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत. महापालिका आयुक्तांनी बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, येत्या दोन-तीन दिवसांत संबंधित बांधकामांवर तसेच अनधिकृत व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे.

सोमनाथ बनकर, विभागप्रमुख, अतिक्रमण निर्मूलन, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news