पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाची नोंदणी रखडली!

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाची नोंदणी रखडली!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, फार्मसी, आर्किटेक्चर अशा प्रमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया अजून सुरू न केल्याने, विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. या प्रवेशप्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार कधी सुरू होतील, याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने पालक अस्वस्थ झाले आहेत.

सीईटी सेलने नर्सिंग सीईटी वगळता विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सर्व सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर केला. त्यानंतर सीईटी सेलने, अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत नोंदणी करण्याचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले होते. त्यानुसार 15 जूनपासून इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर, बी-फार्म, एमबीए, एमसीए, लॉ (पाच वर्षे), बीए/ बीएस्सी -बीएड, बीएड-एमएड, एम-फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांची नोंदणी सुरू होणार होती. मात्र, बीए/ बीएस्सी -बीएड आणि लॉ (पाच वर्षे) लॉ तीन वर्षे, बीएड अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांची नोंदणी सुरू झाली आहे.

तर, इतर अभ्यासक्रमांच्या नोंदणीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्याचप्रमाणे बी-एचएमसीटी, बी-प्लॅनिंग, बी-डिझाइन, एमई/एमटेक अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांची नोंदणी 16 जूनपासून सुरू होणार होती. मात्र, अजूनही नोंदणीला सुरुवात झालेली नाही. बीएड अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया 23 जूनपासून सुरू होणार आहे. एमपीएड, बीपीएड, एम-आर्च, एम-एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नोंदणी 18 जूनपासून सुरू होणार होती. मात्र, कोणतीही नोंदणी सुरू झालेली नाही.

त्याचप्रमाणे माहितीही उपलब्ध नाही. दरम्यान, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांची नोंदणी सुरू झालेली नसल्याने, येत्या 20 जूनपासून बॅचरल ऑफ फाइन आर्टस्, एम -प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी वेळेत सुरू होणार का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशप्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी हीींिीं:// लशींलशश्रश्र. ारहरलशीं. ेीस/ या सीईटी सेलच्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डीटीई पोर्टलवर बीई/बी टेक प्रवेशासाठीच्या संस्था अजूनही अपडेट केल्या जात आहेत. दुसरे म्हणजे एमबीए, बीएड, विधी तीन वर्षे इत्यादी अभ्यासक्रमांसाठी पदवीचे निकाल आवश्यक आहेत. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या नोंदणीला थोडा विलंब होत आहे.

– महेंद्र वारभुवन,
आयुक्त, सीईटी सेल

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news