IAS Pooja Khedkar | 'मीडिया ट्रायल'वरून मला दोषी ठरवू नका - पूजा खेडकर यांचे प्रत्युत्तर

समितीने दिलेला निर्णय मान्य असेल - पूजा खेडकर
IAS Pooja Khedkar on Media
पुण्यातील प्रोबेशनर IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला बदल झाली आहे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाशिममध्ये बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या वादात प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे. "माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने मीडिया ट्रायल सुरू आहे, माझ्यावर जे आरोप होत आहेत, त्याचे उत्तर मी संबंधित समितीसमोर देईन," असे त्या म्हणाल्या.

पूजा खेडकर यांची पुण्यात प्रोबेशनवर नियुक्ती करण्यात आलेली होती. पण त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. या दरम्याने त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र आणि अपंगत्वाच्या घेतलेल्या सवलतींमुळे त्या वादात सापडल्या आहेत.

तपासावर बोलण्याचा अधिकार नाही - पूजा खेडकर

त्या म्हणाल्या, "भारतीय राज्यघटना तथ्यांवर आधारलेली आहे. जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्ती निर्दोष असते. मी तज्ज्ञ समितीपुढे माझे म्हणणे सांगेन आणि समितीचा निर्णय मान्य करेन. आता जो तपास सुरू आहे, त्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. मी जे काही म्हणणे मांडणार आहे, ते जनतेसमोर येईल." ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

दरम्यान पूजा खेडकर यांनी ज्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाने त्यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेतले होते अशी माहिती दिली आहे. पण हा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांनी अपंगत्वाचे कोणतेही प्रमाणपत्र सादर केले नव्हते, असे महाविद्यालयच्या वतीने सांगण्यात आले.

केंद्र सरकारचा अहवाल दोन आठवड्यांत

पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने एक सदस्य समिती गठित केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी दोन आठवड्यात अहवाल सादर करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news