गाळप हंगाम 2016-17 मध्ये महसुली उत्पन्न विभागणीप्रमाणे ज्या कारखान्यांनी ऊस दर दिला नाही, त्या साखर कारखान्यांना गाळप हंगाम 2023-24 साठी गाळप परवाना देवू नये, केंद्रीय कृषीमूल्य आयोगास 2022-23 साठीच्या ऊस गाळप हंगामासाठी वास्तव माहिती दयावी व त्या आधारावर उसाचा दर ठरवावा.साखर कारखान्यांमध्ये गाळप झालेल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकर्याला एकसमान दर दिला पाहिजे, या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्या कारखान्यांची चौकशी करुन फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकर्यांना दयावी.