सणस मैदानावर कोणत्याही ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिलेली नाही. तशा प्रकारची परिस्थिती मैदानावर असेल, तर त्याबाबत त्वरित माहिती घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.– डॉ. चेतना केरुरे उपायुक्त, क्रीडा विभाग पुणे महापालिकासणस मैदानावर सध्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रामध्ये 400 ते 500 खेळाडू सरावासाठी येत असतात. ट्रॅकवर ढोल-ताशा पथकांचा वावर नसला तरी ट्रॅकच्या बाजूने या पथकांचा सराव सुरू असतो. त्यामुळे खेळाडूंना व्यायामासाठी जागा उपलब्ध होत नाही. मनपा प्रशासनाने खेळाडूंच्या अडचणीची दखल घ्यावी. – संदीप निकम, प्रशिक्षक