

पुणे: मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली एलपीजी सिलिंडरची टंचाई आणि शासनाने पीएनजी वापरासाठी सुरू केलेली सक्ती, यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पाइप नॅचरल गॅस अर्थात ‘पीएनजी’ची जोडणी घेणाऱ्या ग््रााहकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत पीएनजीच्या दैनंदिन जोडण्यांमध्ये 25 हजारांचा टप्पा पार झाला आहे. मार्च महिन्यामध्ये पुणे आणि परिसरात पीएनजी कनेक्शन 11 हजार कनेक्शन दिले होते. 1 एप्रिल ते 31 मेदरम्यान एमएनजीएलने आपलाच विक्रम मोडीत काढला आहे, कंपनीकडून गेल्या दोन महिन्यांत 25 हजार जोडण्या दिल्या आहेत.
केंद्र व राज्य सरकारने ज्या भागात पीएनजीची पाइपलाइन उपलब्ध आहे, तेथील नागरिकांना पुढील 3 महिन्यांत एलपीजी सिलिंडर सोडून पीएनजी कनेक्शन घेण्याचे आदेश दिले आहेत. जागतिक स्तरावर एलएनजी वाहतुकीत अडथळे येत असले, तरी केंद्र सरकारच्या धोरणामुळे घरगुती पीएनजी ग््रााहकांसाठी शंभर टक्के गॅस आरक्षित आहे.
त्यामुळे पुण्यात 8 लाख 66 हजार 689 ग््रााहकांचा गॅसपुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि अखंडित राहील, असे देखील ‘एमएनजीएल’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एमएनजीएल’च्या वतीने पुण्यातील एक हजार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पीएनजी वापराबाबत विशेष कॅम्प राबवले असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
‘एमएनजीएल’चे 2 हजार 385 किलोमीटरचे जाळे
सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एमएनजीएल’चे सुमारे दोन हजार 385 किलोमीटरचे पाइपलाइन जाळे पसरलेले आहे. वाढत्या मागणीचा विचार करता कंपनीने आपल्या विस्तारावर भर दिला आहे; जेणेकरून ग््रााहकांना अर्ज केल्यानंतर त्वरित गॅसजोडणी मिळणे सुलभ होईल.