PMPML Office Decoration: टाकाऊपासून टिकाऊ; पीएमपी कार्यालयाला वारली कलेची आकर्षक झळाळी

जुन्या वस्तूंचा कल्पक पुनर्वापर; दुर्मीळ बसफोटो, आकर्षक फर्निचरमधून शून्य कचरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
PMPML Office Decoration
PMPML Office DecorationPudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे: पीएमपी प्रशासनाने कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेचा प्रभावी वापर करत, पीएमपी कार्यालयाची अंतर्गत सजावट केली असून, यामुळे संपूर्ण कार्यालयाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. या उपक्रमामुळे कार्यालयाला एक वेगळीच आकर्षक झळाळी प्राप्त झाली आहे.

PMPML Office Decoration
Maharashtra State Cooperative Bank Loan: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एनसीडीसीकडून ५ हजार कोटींचे कर्ज मंजूर

कार्यालयामध्ये प्रवेश करताच येथील बदल प्रकर्षाने जाणवतात. भिंतींना दिलेला आकर्षक रंग आणि त्यावर केलेले कलात्मक काम लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे, टाकून दिलेल्या काचेच्या बाटल्या जमा करून त्यावर सुरेख रंगकाम केले आहे. या बाटल्यांवर पारंपरिक वारली पेंटिंग साकारून त्या भिंतींवर अत्यंत कल्पकतेने सजवल्या आहेत. ही वारली चित्रकला आणि काचेच्या बाटल्यांचा हा अनोखा प्रयोग कार्यालयाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

PMPML Office Decoration
Pune Municipal Corporation Tender: पुणे महापालिकेच्या निविदांमध्ये सहा-सहा महिन्यांचा विलंब; ‘ब’ पाकिटांवरून विरोधकांचा घणाघात

जुन्या बसगाड्यांचे दुर्मीळ फोटोही सजले

सौंदर्यासोबतच ऐतिहासिक वारशाचा संगमही इथे पाहायला मिळतो. पीएमपीएमएलचा इतिहास उलगडणारे जुन्या बसगाड्यांचे दुर्मीळ फोटो, ऐतिहासिक माहिती देणारे फलक आणि जुन्या बसगाड्यांची पोस्टर्स भिंतींवर लावली आहेत. यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासाची रंजक माहिती मिळत आहे.

PMPML Office Decoration
Pune Municipal Corporation Ward Committees: पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांवर ४५ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती

आकर्षक सोफे आणि खुर्च्या

विविध कामकाजासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बैठकीची उत्तम व्यवस्था केली आहे. टाकून दिलेल्या जुन्या वस्तूंपासून अत्यंत कल्पकतेने आकर्षक सोफे आणि खुर्च्या तयार केल्या आहेत. या बैठकीच्या व्यवस्थेमुळे नागरिकांना आरामदायी अनुभव मिळत असून, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

PMPML Office Decoration
Pune University Girls Hostel: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात रूमवरून वाद; तीन विद्यार्थिनींना बाहेर काढल्याचा आरोप

शून्य कचरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम

संपूर्ण पीएमपीएमएल प्रशासनातर्फे टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून विविध उपयोगी आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्याचे काम व्यापक पातळीवर हाती घेतले आहे. शून्य कचरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम फक्त कार्यालयाची शोभा वाढवत नसून, इतर शासकीय कार्यालयांसाठीही एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे. कार्यालयाचा हा नवा आणि देखणा रूपरंग सध्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news