PMPML Automatic Passenger Count System: पुणे पीएमपीच्या नव्या १ हजार बसमध्ये एआय तंत्रज्ञान; प्रवाशांची मोजणी होणार स्वयंचलित

'ऑटोमॅटिक पॅसेंजर काऊंट' प्रणालीमुळे चढणाऱ्या-उतरणाऱ्या प्रवाशांची रिअल टाइम नोंद; तिकीटविक्रीतील तफावत आणि गैरप्रकारांना बसणार आळा
PMPML
PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

​पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी पुणे पीएमपी प्रशासन आगामी काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन १ हजार बसमध्ये 'ऑटोमॅटिक पॅसेंजर काऊंट' हे अत्यंत आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली बसवणार आहे. आशियातील एखाद्या सार्वजनिक वाहतूक संस्थेत अशा प्रकारची प्रणाली वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

PMPML
Pune Municipal Corporation New Building: पुणे महापालिकेचे नवे प्रशासकीय मुख्यालय शिवाजीनगरात? शिवाजी आखाड्याच्या जागेची चाचपणी

​सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यातील जवळपास २ हजार बस धावत आहेत. मात्र, पुणेकरांची सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही बससंख्या अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती गरज भागवण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नवीन १ हजार बस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नव्या बसच्या ताफ्यातच ही आधुनिक प्रणाली लागू केली जाणार आहे.

PMPML
Pune Municipal Corporation Misconduct Complaint: पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप; माजी उपमहापौरांना प्रवेशबंदी

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पीएमपीएमएलच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन करणे आणि गर्दीच्या मार्गांवर योग्य त्या प्रमाणात बसेस सोडणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे.

PMPML
Pune Drunk Police Inspector: दारूच्या नशेत पोलिस ठाण्यातच निरीक्षकाचा गोंधळ; तक्रारदाराला हाताने, बुटाने मारहाण

​कसे काम करणार 'ऑटोमॅटिक पॅसेंजर काऊंट'?

या प्रणालीअंतर्गत बसमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे बॅकएंडला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाशी जोडलेले असतील. बसमध्ये नेमके किती प्रवासी चढले आणि किती प्रवासी उतरले, याची अचूक नोंद हे एआय सॉफ्टवेअर रिअल-टाईम ठेवेल आणि त्याची माहिती थेट कंट्रोल रूमला पाठवेल.

PMPML
Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाने फावड्याने केली ८० वर्षीय वडिलांची हत्या

​पारदर्शकता आणि उत्पन्नातील सुसूत्रता

बसमधील प्रत्यक्ष प्रवाशांची संख्या आणि तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न यामध्ये अनेकदा तफावत किंवा गोंधळ पाहायला मिळतो. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांची संख्या आणि तिकीट वसुलीचा डेटा तंतोतंत जुळवणे सोपे होणार असून गैरप्रकारांना आळा बसणार आहे​. नवी प्रणाली लागू झाल्यामुळे प्रवासीसंख्या आणि दैनंदिन उत्पन्न यातील तफावत व गोंधळ कायमचा दूर होण्यास मदत होईल आणि पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.