Pune Municipal Corporation Misconduct Complaint: पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप; माजी उपमहापौरांना प्रवेशबंदी

नगरसचिव विभागातील महिला कर्मचाऱ्याची विशाखा समितीकडे तक्रार; पुढील आदेशापर्यंत महापालिका आवारात येण्यास मनाई
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महापालिकेच्या नगरसचिव विभागातील एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप माजी उपमहापौरांवर करण्यात आला आहे. संबंधित महिलेने महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, प्रशासनाने संबंधित माजी उपमहापौरांना पुढील आदेशापर्यंत महापालिका आवारात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

Pune Municipal Corporation
Pune Drunk Police Inspector: दारूच्या नशेत पोलिस ठाण्यातच निरीक्षकाचा गोंधळ; तक्रारदाराला हाताने, बुटाने मारहाण

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी होती. बैठकीच्या वेळी नगरसचिव विभागातील कर्मचारी व अधिकारी कामकाजासाठी उपस्थित होते. जेवणाच्या सुटीत काही कर्मचारी बाहेर गेले असताना संबंधित महिला कर्मचारी कार्यालयात काम करत होती. त्याचवेळी महापालिकेत काही वर्षांपूर्वी उपमहापौरपद भूषविलेले एक माजी नगरसेवक कार्यालयात आले.

Pune Municipal Corporation
Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाने फावड्याने केली ८० वर्षीय वडिलांची हत्या

कार्यालयात आल्यानंतर संबंधित माजी उपमहापौरांनी महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्याशी असभ्य भाषेत संवाद साधल्याचेही म्हटले आहे. महिलेने स्वतःची सुटका करून घेत हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. वरिष्ठांनी तिची बाजू ऐकून घेत धीर दिला.

Pune Municipal Corporation
Hubli Airport Work Fraud: हुबळी विमानतळाच्या कामात २.९८ कोटींचा घोटाळा; पुण्यातील बांधकाम कंपनीची फसवणूक

या घटनेनंतर महापालिकेतील कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असून, संबंधित महिलेने विशाखा समितीकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ''तक्रार प्राप्त झाली असून, त्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल,'' अशी माहिती विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा महापालिकेच्या विधी सल्लागार ॲड. निशा चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.