PMPML Bus Safety: दरवाजे पूर्ण बंद झाल्याशिवाय बस धावणारच नाही...

सिंहगड रस्त्यावरील अपघातानंतर पीएमपी प्रशासन ॲक्शन मोडवर; पीएमपी अध्यक्ष महेश आव्हाड यांचे आदेश
PMPML Bus
PMPML Bus Pudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रस्त्यावर घडलेल्या दुर्दैवी अपघातात बसचा दरवाजा उघडा राहिल्याने एका विद्यार्थिनीचा खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटनेची पीएमपी प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.

या दुर्घटनेमुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाल्याने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता पीएमपीचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय बस मार्गावर न चालवण्याचे आणि बसथांब्यावर बस पूर्ण थांबल्यानंतरच दरवाजे उघडण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

PMPML Bus
Homeopathy Doctor Registration: पुण्यात होमिओपॅथी डॉक्टरांना मिळाले नोंदणी प्रमाणपत्र

पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सर्व डेपो व्यवस्थापक, चालक, वाहक, गेरेज सुपरवायझर, डेपो अभियंता आणि सिनिअर फोरमन यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नुकतेच या संदर्भात दैनिक 'पुढारी' कडून वृत्तप्रसिद्ध करण्यात आले होते.

तपासूनच बस मार्गावर सोडणार...

दररोज बस डेपोमधून मार्गावर सोडण्यापूर्वी सर्व दरवाजांची उघडझाप सुरळीत होते की नाही, याची पूर्ण खात्री करूनच बस संचालनास उपलब्ध करण्याचे आदेश पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक महेश आव्हाड यांनी दिली आहे.

PMPML Bus
Tea Price Hike: कपभर चहाचा गोडवाही महागला! साखरेच्या दरवाढीने चहाचे दर वाढले

चालकांसाठी कडक नियमावली...

बस मार्गावर चालवताना सर्व दरवाजे पूर्णपणे बंद करूनच बस पुढे नेण्यात यावी. तसेच, बसथांब्यावर बस पूर्ण थांबल्यानंतरच दरवाजे उघडण्यात यावेत. अशा सूचनाही अध्यक्ष आव्हाड यांनी दिल्या आहेत.

निष्काळजीपणा केल्यास कारवाई...

दैनंदिन संचालनादरम्यान या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा दरवाजांच्या देखभालीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्य वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे यांनी दिला आहे...

नादुरुस्त दरवाजे त्वरित दुरुस्त करणार

पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील ज्या बसचे डाव्या बाजूचे पुढील, मागील व बी.आर.टी. दरवाजे नादुरुस्त आहेत, ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news