Homeopathy Doctor Registration: पुण्यात होमिओपॅथी डॉक्टरांना मिळाले नोंदणी प्रमाणपत्र

पुण्यात अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या त्या पहिल्या, तर राज्यातील दुसऱ्या डॉक्टर ठरल्या आहेत.
Homeopathy Doctor
Homeopathy DoctorPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सरकारने बीएचएमएस व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पदविकाधारक होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.

या अंतर्गत पुण्यातील होमिओपॅथीच्या डॉ. राजश्री मेमाणे यांना सोमवारी नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पुण्यात अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या त्या पहिल्या, तर राज्यातील दुसऱ्या डॉक्टर ठरल्या आहेत.

Homeopathy Doctor
Tea Price Hike: कपभर चहाचा गोडवाही महागला! साखरेच्या दरवाढीने चहाचे दर वाढले

डॉ. मेमाणे मागील २५ वर्षांपासून धायरी परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत. या नोंदणीमुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांना कायदेशीररीत्या ॲलोपॅथी औषधे लिहून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या नोंदणी प्रक्रियेवरून गेल्या अनेक वर्षांपासून ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांमध्ये वाद सुरू आहे. ४ ऑगस्ट रोजी राज्यात पहिली नोंदणी झाली होती, त्यानंतर ॲलोपॅथी डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला होता.

Homeopathy Doctor
Jejuri Accident News: जेजुरी एमआयडीसीतील शालिना चौकात तीन दुचाकींचा अपघात; सहा जण जखमी

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ७ ऑगस्ट रोजी हा संप मागे घेण्यात आला. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी सरकारने या नोंदणीला स्थगिती दिली होती, मात्र २१ ऑगस्ट रोजी नोंदणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या नोंदणीला आयएमए व निवासी डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेने विरोध दर्शवला आहे. रुग्णांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून, या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा आणि जनजागृती सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news