PMC Standing Committee: स्थायी समितीत उपनगरांना प्राधान्य; नव्याने समाविष्ट गावांतील नगरसेवकांना संधी

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या स्थायी समितीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून उपनगरांवर भर; विकासाला गती मिळण्याची अपेक्षा
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी भाजपकडून महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील बहुतांश नगरसेवकांची वर्णी लावली आहे, तर राष्ट्रवादी काँग््रेास-काँग््रेासकडूनही उपनगरांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या माध्यमातून उपनगरांना विकासाची संधी उपलब्ध होणार आहे.

Pune Municipal Corporation
Pune Road Development: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका; 32 प्रमुख रस्त्यांवरील प्रवास वेगवान, प्लान तयार

महापालिकेच्या स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सदस्यांची शुक्रवारी मुख्यसभेत निवड करण्यात आली. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य असून, संख्याबळानुसार भाजपचे सर्वाधिक 13, राष्ट्रवादी काँग््रेासचे तीन, तर काँग््रेास एक अशा पद्धतीने सदस्यसंख्या असणार आहे. यात भाजपने स्थायी समितीत प्रामुख्याने एक ते दीड लाख लोकसंख्येच्या प्रभागातून निवडून आलेल्या बहुतांश नव्या सदस्यांना संधी देत समतोल साधला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सदस्यांना संधी देण्यात आली असून, महापालिका निवडणूकीच्या आधी शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून माजी महापौर वैशाली बनकर यांच्यासह भाजपमधून आलेल्या अमोल बालवडकर आणि एकमेव चार सदस्यांचा प्रभाग निवडून आणणारे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचे बंधू नगरसेवक सुहास टिंगरे यांना संधी दिली आहे, तर काँग््रेासने माजी महापौर प्रशांत जगताप यांनी संधी दिली आहे.

Pune Municipal Corporation
Pune District Annual Plan Meeting: पुणे जिल्हा वार्षिक योजनेस 1,379 कोटींचा निधी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

महापालिकेतील विषय समिती सदस्य

  • विधी समिती : भाजप - हर्षदा भोसले, सिद्धी शिळीमकर, स्वरदा बापट, अर्चना जगताप, पूजा पांचाळ, पायल तुपे, शैलजित बनसोडे, वर्षा साठे, मिताली सावळेकर, हरिदास चरवड. राष्ट्रवादी काँग््रेास - रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे. काँग््रेास - साहिल केदारी.

  • शहर सुधारणा : भाजप - मारुती तुपे, श्रेयस खांदवे, श्रीकांत जगताप, मृणाल कांबळे, पुनित जोशी, सुभाष नाणेकर, किशोर धायरकर, सपना छाजेड, स्वप्नाली पंडित, स्मिता वस्ते, राष्ट्रवादी काँग््रेास - स्वप्नील दुधाने, अजित घुले. काँग््रेास - रफिक शेख,

  • महिला-बालकल्याण : भाजप - अर्चना पाटील, कोमल शेंडकर, ज्योती गोसावी, ज्योत्स्ना कुलकर्णी, उज्ज्वला जंगले, तन्वी दिवेकर, अल्पना वरपे, भक्ती गायकवाड, रोहिणी चिमटे, ऐश्वर्या थोरात. राष्ट्रवादी काँग््रेास - सुरेखा कवडे, प्रिया गदादे. काँग््रेास - अश्विनी लांडगे.

  • क्रीडा : भाजप - बाळा धनकवडे, व्यंकोजी खोपडे, अपूर्व खाडे, सई थोपटे, तेजश्री पवळे, नारायण गलांडे, रेश्मा बराटे, स्नेहा माळवदे, दिनेश माथवड, महेश आवळे. राष्ट्रवादी काँग््रेास - गौरव घुले, प्रतीक कदम. काँग््रेास - सय्यद काशीफ

  • शिक्षण समिती : भाजप - अरुण राजवाडे, अतुल तरवडे, ऐश्वर्या पाटील, निवेदिता एकबोटे, मनीषा बुटाला, सारिका घुले, वृषाली रिठे, कोमल नवले, वीणा घोष, कुणाल टिळक. राष्ट्रवादी काँग््रेास - शीतल सावंत, हर्षवर्धन मानकर. काँग््रेास - अरविंद शिंदे.

  • नाव समिती : भाजप - शैलजा भोसले, सुनील पांडे, अश्विनी भंडारे, रूपाली पवार, खंडू सतीश लोंढे, रामदास दाभाडे, उज्ज्वला यादव, पल्लवी जावळे, सायली वांजळे, विवेक यादव. राष्ट्रवादी गणेश कल्याणकर, श्वेता घुले. कॉंग््रेास - वैशाली भालेराव.

Pune Municipal Corporation
Pune Property Tax Abhay Scheme: मिळकतकर ‘अभय योजना’ संपण्यास दोनच दिवस; 75% व्याज सवलतीची शेवटची संधी

अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमालेंचे नाव निश्चित

स्थायीत भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले, रूपाली धाडवे कालिंदा पुंडे यांच्यासह शिवसेनेतून आलेले विशाल धनवडे, प्राची आल्हाट तसेच समाविष्ट गावांमधून जयश्री भूमकर, दादा कोद्रे, मयूरी कोकाटे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, रत्नमाला सातव यांना संधी आहे, तर शिवाजीनगर मतदारसंघातून निशा मानवतकर यांना संधी देण्यात आली. हे सर्व पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून, त्यांची थेट स्थायी समितीत वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपच्या सदस्यांमध्ये श्रीनाथ भिमाले यांचे नाव अध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित असून, समितीत भाजपचे मताधिक्य असल्याने भिमाले यांची अध्यक्षपदासाठीची निवड केवळ औपचारिकता असणार आहे. भिमाले यांनी मागील सभागृहात सभागृहनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेली होती.

Pune Municipal Corporation
Maharashtra Tribal Overseas Scholarship: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; शिष्यवृत्तीसाठी तातडीने अर्ज करा

स्थायी समितीच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संधी देण्यात आली आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी आहे. तसेच या गावांचे प्रभागही मोठे होते. त्यामुळे त्या भागातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून चांगले काम होईल असा विश्वास आहे.

गणेश बिडकर, गटनेते, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news