Maharashtra Tribal Overseas Scholarship: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; शिष्यवृत्तीसाठी तातडीने अर्ज करा

पीएच.डी. व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 40 विद्यार्थ्यांना लाभ; शिक्षण, निवास, विमानप्रवासाचा खर्च शासनाकडून
Overseas Scholarship
Overseas ScholarshipPudhari
Published on
Updated on

पुणे: परदेशातील नामांकित विद्यापीठात पीएच.डी., पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी तत्काळ ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.

Overseas Scholarship
Bhimashankar Temple Closed Mahashivratri: महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद; प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा, यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‌‘परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती‌’ योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 40 गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

Overseas Scholarship
Shrinath Mhasoba Veer Yatra Festival: श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची रंगशिंपणाने सांगता; भाविकांचा जनसागर

शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा यांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च यूएस व इतर देशांसाठी (यूके वगळून) 1 हजार 500 यूएस डॉलर, तर युकेसाठी 1 हजार 100 जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल.

Overseas Scholarship
Maharashtra Sugar Mill Digital Weighbridge Policy: ऊस काटामारी रोखण्यासाठी डिजिटल वजनकाटे; साखर आयुक्तांचे महत्त्वपूर्ण निर्देश

...असे आहेत निकष

विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, तर पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाख रुपये तसेच विद्यापीठांची क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा 200 च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत शिथिल केली जाईल, तर क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा 200 पासून पुढे चढत्या क्रमाने 300 पर्यंत ग््रााह्य धरण्यात येईल. परदेशात उच्चशिक्षणासाठी आवश्यक ‌‘टीओईएफएल‌’ किंवा ‌‘आयईएलटीएस‌’ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

Overseas Scholarship
Pune Spa Prostitution Crackdown 2025: स्पा सेंटरच्या आडून वेश्या व्यवसायावर पोलिसांची मोठी कारवाई; 38 विदेशी तरुणींची सुटका

संकेतस्थळाला भेट द्यावी

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विभागाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news