प्रशासनाने रखडलेला वेतन प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात तत्परता दाखवली. सात दिवसांच्या आत वेतन करण्यात येणार असून, शाळेमध्ये जाण्याचे आवाहन केले होते. याखेरीज, शाळेतील अन्य सहकारी शिक्षकांवर येणारा ताण व परीक्षांचा कालावधी जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे, कंत्राटी शिक्षकांनी पुन्हा काम करण्यात सुरुवात केली आहे.
– प्रवीण खेडकर,
कंत्राटी शिक्षक.
वेतन रखडल्याने शिक्षकांचे, तर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर शाळेत रुजू झालो आहे. प्रशासनानेही आश्वासनानुसार वेळेत वेतन जमा करावे तसेच पुढे या स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिक्षकांना आंदोलनापेक्षा शिकविण्यात जास्त रस आहे.
– नितीन सुपेकर, कंत्राटी शिक्षक.
काही प्रशासकीय कारणांमुळे कंत्राटी पध्दतीने भरलेल्या शिक्षकांच्या वेतनाची प्रक्रिया रखडली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुरुवारपर्यंत (दि. 12) सर्व शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येईल.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका.