Nagar News : आ.जगताप, विखेंकडून हेरंब कुलकर्णींची भेट | पुढारी

Nagar News : आ.जगताप, विखेंकडून हेरंब कुलकर्णींची भेट

नगर : सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना काही गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार जगताप म्हणाले, विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी अवैध धंदे, गुटका विक्री होत असेल तर विद्यार्थी कसा घडेल, या विचाराने कुलकर्णी यांनी सारडा विद्यालय परिसरातील गुटख्याच्या टपर्‍या काढण्याची मागणी केली. त्याचा राग मनात धरून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. शिक्षण क्षेत्रावरील हा भ्याड हल्ला असून, हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी. शालिनीताई विखे म्हणाल्या, पोलिसांनी भ्याड हल्ला करणार्‍यावर कडक कारवाई करावी. अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला. जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी ओला यांनी आरोपींना जेरबंद केल्याचे सांगितले.

हेही वाचा:

Back to top button