पुणे : ‘कमला नेहरू’ला संजीवनी ; अद्ययावत सुविधांसह लवकरच होणार नूतनीकरण

पुणे : ‘कमला नेहरू’ला संजीवनी ; अद्ययावत सुविधांसह लवकरच होणार नूतनीकरण

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : कमला नेहरू रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, निर्जंतुक कक्ष, अतितातडीच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. खाटांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. आराखड्याला महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाली असून, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस आहे. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय हे महापालिकेचे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे.

दररोज हजारहून अधिक रुग्ण येथे उपचारांसाठी येतात. बरेचदा वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांना ससून रुग्णालयात पाठवावे लागते. त्याचप्रमाणे रुग्णालयातील लिफ्ट बंद पडणे, डायलिसिस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी, बाह्यरुग्ण विभागासाठी असलेली अपुरी जागा अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. या सर्व अडचणी दूर करून कमला नेहरू रुग्णालय खासगी रुग्णालयाच्या दर्जाचे करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. रुग्णालयात 24 बाय 7 तातडीच्या उपचार सुविधा उपलब्ध असतील. अतिगंभीर रुग्णांना प्रत्यक्ष उपचार मिळण्यापूर्वी स्थिर करण्यासाठी सर्व साधनसामग्री आणि स्टाफ यांची व्यवस्था केली जाणार आहे. मनुष्यबळातही वाढ करण्यात येणार आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांपासून पॅरामेडिकल कर्मचार्‍यांपर्यंत आणखी 120 लोकांना कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे. कमला नेहरू रुग्णालयातील नूतनीकरणाला महापालिका आयुक्तांची परवानगी मिळाली आहे. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

सर्व सुविधा पीपीपी तत्त्वावर न पुरवता निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांना खासगी रुग्णालयातील दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.
                                 – डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

पालिकेची रुग्णालये आणि बेड संख्या
रुग्णालये क्षमता उपलब्ध बेड
कमला नेहरू रुग्णालय 400 270
मुरलीधर लायगुडे दवाखाना 100 17
सोनावणे प्रसूतिगृह 100 76
दळवी हॉस्पिटल 100 20
राजीव गांधी रुग्णालय 100 55

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news