पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो जानेवारी अखेर धावणार

पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो जानेवारी अखेर धावणार
Published on
Updated on

महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा : पिंपरी : महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते फुगेवाडी या 6 किलोमीटर अंतराच्या मार्गावरील स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीअखेरीस मेट्रो धावण्याचे नियोजन असल्याचा दावा करीत मेट्रो उद्घाटनाचा मुहूर्त केंद्र व राज्य सरकार निश्चित करेल, असे सांगून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी उद्घाटनाच्या तारखेस बगल दिली.

मंगळवारी (दि. 23) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ, ऑपरेशन मेंटेनन्स विभागाचे महाव्यवस्थापक राजेश द्विवेदी, डॉ. हेमंत सोनवणे व अधिकारी उपस्थित होेते.

डॉ. दीक्षित म्हणाले की, कोरोना संक्रमण व लॉकडाऊनच्या नव्या आव्हानामुळे मेट्रो सुरू करण्यास बिलंब झाला आहे. जानेवारी महिन्याअखेरीस पिंपरी ते फुगेवाडी मार्गावरील स्टेशनची सर्व कामे पूर्ण केली जातील.

कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीने नुकतीत पाहणी केली असून, लवकरच प्रवासी वाहतुकीस अंतिम परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे.

केंद्र व राज्य सरकार मेट्रोच्या उद्घाटनाचा निर्णय घेतील. त्याप्रमाणे महामेट्रोकडून कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, फुगेवाडी ते रेंजहिल्स मार्गाचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होईल.

पहिल्या टप्प्यातील रिच वन व रिच टूची कामे या वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे ते म्हणाले.पीएमपीएल व एसटी बसप्रमाणे मेट्रोच्या तिकिटात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. सर्वांचा विचार करूनच तिकीटदर निश्चित केला आहे. तिकिटाचा दर दहा रुपयांपासून सुरू होतो.

प्रवासी सेवेतून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून न राहता इतर विविध बाह्यउत्पन्नावर महामेट्रोने भर दिला आहे. ती देशातील नवीन संकल्पना आहे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, पूर्णपणे तयार झालेल्या संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशनची पाहणी करण्यात आली.

मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील मार्ग

  • वनाज ते चांदणी चौक (1.5 कि.मी.)
  • रामवाडी ते वाघोली (12 कि.मी.)
  • हडपसर ते खराडी (5 कि.मी.)
  • स्वारगेट ते हडपसर (7 कि.मी.)
  • खडकवासला ते स्वारगेट (13 कि.मी.)
  • एसएनडीटी ते वारजे (8 कि.मी.)
  • एचसीएमटीआर (36 कि.मी.)

संत तुकारामनगर स्टेशनवर अद्ययावत सेवा-सुविधा

मेट्रो प्रवाशांत संत तुकारामनगर स्टेशनवर अद्ययावत सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच, सुरक्षा व्यवस्थेसह सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर तिकीट केंद्र, मदत केंद्र, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. तिकीट काढल्यानंतरच पहिल्या मजल्यावरील स्टेशन परिसरात प्रवेश मिळणार आहे. तर, दुसर्‍या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवरून मेट्रोत बसून ये-जा करता येणार आहे.

अग्निशमन यंत्रणा

मेट्रो स्टेशन, प्लॅटफॉर्म व मेट्रोत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. आगीची दुर्घटना घडल्यास तत्काळ त्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविता येणार आहे.

तिकीट स्कॅन व एन्ट्री

तिकीट घेतल्यानंतर प्रवेशद्वारावर तिकीट स्कॅन करावे लागणार आहे. तिकीट स्कॅन झाल्यानंतर प्रवाशाला प्रवेश मिळणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे

स्टेशनवर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रत्येक नागरिकावर मेट्रो व्यवस्थापनाचे बारीक लक्ष असणार आहे.

मेट्रो तिकीट

मेट्रोचे संगणकीय तिकीट. हे तिकीट रोखीने, डेबिट व क्रेडिटकार्ड, तसेच पेमेंट अ‍ॅपने देण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी सुविधा

मेट्रोने प्रवास करणार्‍या दिव्यांगांसाठी स्टेशन व मेट्रोवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर असून, त्यांच्यासाठी कमी उंचीची तिकीट खिडकी आहे.

स्कॅनर

स्टेशनवर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाच्या बॅगची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news