Pimpri Nigdi Metro: पिंपरी ते निगडी मेट्रो जून २०२७ पर्यंत धावणार; दुसऱ्या टप्प्यातील कामाला वेग

प्रकल्पाचे ५४.९० टक्के काम पूर्ण; स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्ग २०२९ पर्यंत सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना मोठा वेग आला असून, टप्पा-२ मधील पिंपरी ते निगडी मार्गावरील मेट्रोसेवा जून २०२७ च्या अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pune Metro
Pune University Student Protest: पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचे ठिय्या आंदोलन; वादग्रस्त परिपत्रके मागे घेण्याची मागणी

पत्रकार परिषदेत माहिती देताना हर्डीकर त्यांनी पुणे मेट्रोच्या विस्तार आणि आगामी प्रकल्पांची सविस्तर आकडेवारी व रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, टप्पा-२ मधील निगडीपर्यंतचा विस्तार फेब्रुवारीअखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे लक्ष्य आहे. जून २०२७ पर्यंत या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण केली जातील. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ५४.९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

Pune Metro
Pune Water Quota: पुण्याचा पाणी कोटा वाढवा; ११.३३ टीएमसीऐवजी १६.१९२ टीएमसी पाण्याची मागणी

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्ग

स्वारगेट ते कात्रज यादरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक वळवून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करून मेट्रोसेवा सुरू करण्यात येईल.

Pune Metro
Kurkumbh MIDC Pollution: कुरकुंभ एमआयडीसीच्या प्रदूषणाचा संशय; शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी हिरवट, उग्र वासाने चिंता

शिवाजीनगर एसटी स्थानकासाठी करार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत लवकरच सामंजस्य करार (एमओयू) केला जाणार आहे. हा करार पूर्ण होताच महामेट्रोकडून शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान करण्यासाठी महामेट्रो प्रशासनाकडून सर्व प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Pune Metro
Bhigwan Elderly Woman Funeral: मुलांनी फिरवली पाठ; भिगवणमध्ये गावातील तरुणांनी केला वृद्ध मातेचा अंत्यविधी

खडकवासला मार्ग व डेपो

या मार्गाचे टेंडर काढले असून, सध्या सर्व्हेचे काम सुरू आहे. खडकवासला येथील मेट्रो डेपोसाठी जागा अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे.

पुरंदर विमानतळ मेट्रो जोडणी

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळा पर्यंत मेट्रो नेण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी लवकरच एका विशेष एजन्सीची नियुक्ती केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.