Pune University Student Protest: पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचे ठिय्या आंदोलन; वादग्रस्त परिपत्रके मागे घेण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर निर्बंध आणल्याचा आरोप; ४ नोव्हेंबरच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत निर्णयाचा पुनर्विचार होणार
Pune University Student Protest
Pune University Student ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या परिपत्रकांविरोधात सोमवारी (दि.२) विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मुख्य इमारत परिसरात दुपारी बारानंतर एका संघटनेने, तर ४ वाजल्यानंतर अन्य संघटनांनी ठिय्या मांडला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला.

Pune University Student Protest
Pune Water Quota: पुण्याचा पाणी कोटा वाढवा; ११.३३ टीएमसीऐवजी १६.१९२ टीएमसी पाण्याची मागणी

विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘कुलसचिव कुठे मिळतील? आरएसएस दप्तरात’, ‘व्यवस्थापन परिषद कुठे मिळेल? आरएसएस दप्तरात’, ‘कुलसचिव हटवा’, ‘परिपत्रक मागे घ्या’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘आंबेडकर आंबेडकर’ अशा घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला.

Pune University Student Protest
Kurkumbh MIDC Pollution: कुरकुंभ एमआयडीसीच्या प्रदूषणाचा संशय; शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी हिरवट, उग्र वासाने चिंता

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर मर्यादा आणणारी परिपत्रके जारी केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. यामध्ये परिपत्रक क्रमांक ३१६/२०२४ आणि २२६/२०२६ यांचा समावेश असून, ही परिपत्रके विद्यार्थ्यांच्या आंदोलन, सभा, मोर्चे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणणारी असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंना निवेदन देत संबंधित परिपत्रके तत्काळ मागे घेण्याची मागणी केली होती.

Pune University Student Protest
Bhigwan Elderly Woman Funeral: मुलांनी फिरवली पाठ; भिगवणमध्ये गावातील तरुणांनी केला वृद्ध मातेचा अंत्यविधी

व्यवस्थापन परिषदेत उमटणार पडसाद

व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनासंदर्भातील निर्णय हा व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार कुलगुरू, तसेच प्र-कुलगुरूंना नाही. तसेच येत्या ४ नोव्हेंबरला व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. यामध्ये संबंधित निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्यात येईल आणि आंदोलनासंदर्भातील एक एसओपी ठरविण्यात येणार असून, ती जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.