Bhigwan Elderly Woman Funeral: मुलांनी फिरवली पाठ; भिगवणमध्ये गावातील तरुणांनी केला वृद्ध मातेचा अंत्यविधी

आयुष्यभर कष्ट करून संसार सांभाळणाऱ्या माउलीला अखेरच्या प्रवासात रक्ताच्या नात्यांची साथ नाही; तरुणांनी जपली माणुसकी
Funeral
FuneralPudhari
Published on: 
Updated on: 

भिगवण: आयुष्यभर कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा आणि मुलीने अंत्यविधीकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक घटना भिगवण (ता. इंदापूर) परिसरात घडली. अखेर गावातील संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेत या माउलीला खांदा दिला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

Funeral
Khadakwasla Dam Water Storage: पुण्यात मुसळधार पाऊस, पण धरणक्षेत्र कोरडेच! खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट

गुरुवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने महिलेचे निधन झाले. आयुष्यभर जेवणाचे डबे आणि बेकरीचा व्यवसाय करून तिने कष्टाने संसार चालवला होता. आईच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर एक मुलगी घटनास्थळी आली. दुसऱ्या मुलीला निरोप दिला असता नुकतेच ऑपरेशन झाले असून, डॉक्टरांनी रडण्याच्या प्रसंगांना उपस्थित राहण्यास मनाई केल्याचे कारण तिने सांगितले.

Funeral
Hadapsar Water Shortage: हडपसर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; ५० हजार लोकसंख्येला केवळ ३ लाख लिटर पाणी

दुसरीकडे, मुलानेही अंत्यविधीसाठी येण्याचे टाळले. जन्मदात्या आईच्या अंत्यविधीसाठी मुले उपस्थित नसल्याने अखेरीस गावातील राहुल गाडे, अमितकुमार वाघ, संजय गिते, रोहित भरणे आणि बाळू मोहिते या तरुणांनी पुढाकार घेतला. त्यांनी अंत्यविधीचे धार्मिक सोपस्कार पूर्ण केले तसेच आईसमान या माउलीला खांदा देत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

Funeral
Pune Fort Making Competition: पुण्यात बालचमूंच्या हातून साकारताहेत शिवकालीन गडकिल्ले; ३२ व्या किल्ले स्पर्धेची लगबग

या घटनेमुळे कौटुंबिक नात्यांमधील दुरावा आणि वृद्ध माता-पित्यांप्रती असलेल्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयुष्यभर मुलांसाठी कष्ट करणाऱ्या आईला अखेरच्या क्षणी मुलांचा आधार मिळू नये, ही बाब समाजासाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, तरी गावातील तरुणांनी माणुसकी जपत दिलेला आधार प्रेरणादायी ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.