Kurkumbh MIDC Pollution: कुरकुंभ एमआयडीसीच्या प्रदूषणाचा संशय; शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी हिरवट, उग्र वासाने चिंता

विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा शेतकऱ्याचा दावा; जलनमुन्यांची तपासणी करून औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी
Kurkumbh MIDC Pollution
Kurkumbh MIDC PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

पांढरेवाडी: कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीमुळे एकीकडे कारखानदारीचा विस्तार झाला असला तरी प्रदूषणामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुरकुंभ येथील शेतकरी मोहन अण्णा भोसले यांच्या विहिरीत आणि विहिरीच्या परिसरात दूषित पाणी उतरले आहे. विहिरीतील पाण्यावर हिरवट थर दिसून येत आहे. पाण्याला उग्र वास येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Kurkumbh MIDC Pollution
Bhigwan Elderly Woman Funeral: मुलांनी फिरवली पाठ; भिगवणमध्ये गावातील तरुणांनी केला वृद्ध मातेचा अंत्यविधी

भोसले यांच्या विहिरीतील पाण्याची गुणवत्ता संशयास्पद बनल्याने शेतीसाठी या पाण्याचा वापर करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापनाचा विषय यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

Kurkumbh MIDC Pollution
Khadakwasla Dam Water Storage: पुण्यात मुसळधार पाऊस, पण धरणक्षेत्र कोरडेच! खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट

औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जाते का? प्रक्रिया न केलेले पाणी जमिनीत झिरपून परिसरातील विहिरींच्या पाण्यात मिसळते का? औद्योगिक सांडपाण्याच्या निचऱ्यावर संबंधित यंत्रणांचे पुरेसे नियंत्रण आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

Kurkumbh MIDC Pollution
Hadapsar Water Shortage: हडपसर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; ५० हजार लोकसंख्येला केवळ ३ लाख लिटर पाणी

औद्योगिक विकासामुळे रोजगार आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळत असली, तरी त्याच परिसरातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सुरक्षितता धोक्यात येणे ही बाब गंभीर आहे. विहिरीतील पाणी दूषित होण्यामागील नेमके कारण प्रशासनाने शोधावे, अशी मागणी होत आहे.

Kurkumbh MIDC Pollution
Pune Fort Making Competition: पुण्यात बालचमूंच्या हातून साकारताहेत शिवकालीन गडकिल्ले; ३२ व्या किल्ले स्पर्धेची लगबग

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने संबंधित विहिरीची पाहणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत. तसेच एमआयडीसीमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, निचरा व्यवस्था आणि संबंधित उद्योगांच्या सांडपाणी व्यवस्थापनाची तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणार का, याकडे शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.