Pimpri News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; केंद्राकडून 410 कोटी

Pimpri News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; केंद्राकडून 410 कोटी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) राबविण्यात येत असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन-3 या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.

या प्रकल्पाची 23.203 किलोमीटर इतकी लांबी आहे. तर, 8 हजार 313 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च होणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल या सवलतकार कंपनीमार्फत करण्यात येत आहे. प्रकल्पाचा सवलत करारनामा 21 सप्टेंबर 2019 रोजी स्वाक्षांकित करण्यात आला आहे. तसेच, 25 नोव्हेंबर 2021 ही नियुक्ती तारीख (अपॉईंटेड डेट) आहे. प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी केंद्रामार्फत 1 हजार 225 कोटी इतका व्यवहार्यता तफावत निधी अपेक्षित आहे. प्रकल्पाचे सवलतकार पुणे आयटी सीटी मेट्रो रेल यांनी 100 टक्के इक्विटीची गुंतवणूक केली आहे. त्या प्रमाणात बँकेद्वारे कर्जपुरवठा करण्यात आला. त्यामुळे केंद्राकडून 1 हजार 225 कोटींपैकी 410 कोटी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईनसाठी 410 कोटी रुपये केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. हा निधी मिळाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून काम लवकर पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल.

– राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news