Pimpri News : पात्र उमेदवार नोव्हेंबरअखेरपर्यंत रुजू

Pimpri News : पात्र उमेदवार नोव्हेंबरअखेरपर्यंत रुजू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी दिवाळीनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व 368 उमेदवारांना विविध पदांवर रुजू करून घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 पदांसाठी 368 जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली.

परीक्षेनंतर 11 पदांसाठी 35 जागांचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर झाला. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अ‍ॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा त्यात समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल 30 जार 581 अर्जदार बसले होते.

त्यांचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर करण्यात आला. पात्र सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यांनी परीक्षा दिलेल्या संस्था शासनमान्य असल्याचे तपासणी केली जात आहे. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. त्यानंतर आयुक्तांची मान्यता घेऊन अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर विविध पदांसाठी 368 जणांना महापालिकेत रुजू करून घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

कागदपत्रे तपासणीचे काम अंतिम टप्प्यात

आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. सादर केलेली प्रमाणपत्रे शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे आहेत की नाही हे तपासणे सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीची मंजुरी घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल. त्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news