पिंपरी : पालिकेच्या वादग्रस्त ठरलेला आकाशचिन्ह, परवाना विभाग इंगळेंकडे

पिंपरी : पालिकेच्या वादग्रस्त ठरलेला आकाशचिन्ह, परवाना विभाग इंगळेंकडे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वादग्रस्त आकाशचिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.19) काढला आहे. किवळे येथील होर्डिंग पडून 5 जणांचा नाहक मृत्यू व 3 जण गंभीर जखमी झाल्याने हा विभाग वादग्रस्त ठरला आहे.

आयुक्त सिंह यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या 13 एप्रिलला अचानक बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडून आकाशचिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी काढून ती सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याकडे दिली. मात्र, जोशी यांनी पालिकेतील काम थांबवण्याची विनंती शासनाकडे केली. ते पालिका सेवेतून कार्यमुक्त झाले.

त्यामुळे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आता उपायुक्त इंगळे यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाचा पदभार देण्यात आला आहे. तसेच, त्यांच्याकडे कामगार कल्याण विभागाचीदेखील जबाबदारी असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news