Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागात पाणीच पाणी, वाहतूक विस्कळीत

पहिल्याच दमदार पावसाने शहरात पूरसदृशस्थिती; चिखली, मोशी, भोसरी परिसरात रस्ते जलमय, महापालिकेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
Rain
RainPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसराला पावसाने रविवार (दि. २८) चांगलेच झोडपले. दुपारी तीन नंतर आलेल्या पावसाने थोड्याच वेळात परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी केले. मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे महापूरसदृशिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्याच दमदार पावसामुुुळे शहराचा बोजवारा उडाला असून प्रशासकीय दाव्यांचे वाभाडे निघाले आहेत. शहरात कुठेही पाणी साचू नये म्हणून पालिकेकडून पावसाळापूर्व केमी असल्याचे सांगितले जात आहे; परंतु अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पालिकेचा दावा फोल ठरत आहे.

Rain
Fake Degree Promotion Scam PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस पदव्यांवर पदोन्नती प्रकरण; तीन सदस्यीय समिती स्थापन

चिखली, मोशी, भोसरी, चऱ्होली, वाल्हेकरवाडी याठिकाणी जोरदार पाऊस झाला. मावळ परिसरातही रविवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. हवेत उष्माही जाणवत होता. दुपारी तीननंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आलेल्या जोराच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Rain
Smart City Road Digging Controversy: पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते खोदाईवर प्रश्नचिन्ह; स्मार्ट सिटी प्रकल्पाला पावसाळ्यात विशेष परवानगी

थोड्याच कालावधीत दमदार पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. यातून वाहनचालकांना गाडी काढताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र होते. देहू-आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे हाल झाले. साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने जीव मुठीत घेवून जावे लागले.

Rain
Bhosari School Book Scam: भोसरीत खासगी शाळांची मनमानी; पुस्तक-वही खरेदीस सक्ती, पालक त्रस्त

दमदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रविवार असल्याने खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांना पावसाने झोडपले. आडोसा शोधेपर्यंत नागिरक पावसाने आलेचिंब झाले होते. पावसामुळे नागरिकांना पाऊस थांबेपर्यंत आडोशाला उभारावे लागले. मोशी, आळंदी , स्पाइन रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.

Rain
Nashik Phata Bridge Delay: कासारवाडी नाशिक फाटा फूट ओव्हर ब्रिज रखडला; वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला

पावसाचा जोर जास्त असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. उद्योगनगरीतील काही भागातील रस्ते पाण्याने तुंबले होते. रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्याचे दृश्य होते. पहिल्याच दमदार पावसाने पूरसदृशस्थिती निर्माण केल्याने पालिका प्रशासनाची पावसाळापूर्व कामांची पोलखोल केल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news