Nashik Phata Bridge Delay: कासारवाडी नाशिक फाटा फूट ओव्हर ब्रिज रखडला; वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला

२० कोटींचा प्रकल्प संथ गतीने सुरू; नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याने संताप
Nashik Phata Bridge Delay
Nashik Phata Bridge DelayPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील नागरिकांना बस, मेट्रो, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, सुरक्षितपणे स्टेशन व थांब्यांपर्यत तसेच, रस्त्या ओलांडण्यासाठी महामेट्रोकडून कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात फूट ओव्हर ब्रिज (पादचारी पूल) उभारण्यात येत आहे. मात्र, त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

Nashik Phata Bridge Delay
Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये १५% पाणी कपात; तरीही पाण्याची नासाडी सुरूच, कारवाई नाही

नाशिक फाटा चौकात निगडी ते दापोडी दुहेरी बीआरटी मार्ग आहे. भोसरी, चाकण ते पुणे अशी बस सेवा आहे. कासारवाडी रेल्वे स्टेशन आहे. पुणे-नाशिक महामार्ग असल्याने तेथील एसटी थांब्यावरून नाशिकला ये-जा करता येते.

Nashik Phata Bridge Delay
Pimpri Chinchwad Divyang Pension: पिंपरी-चिंचवडमध्ये दिव्यांग पेन्शनसाठी नवे अधिकार; २५०० रुपये पेन्शन वेळेत मिळणार

मेट्रोचे नाशिक फाटा स्टेशन या चौकात आहे. जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरून कासारवाडीहून भोसरीला जाता येते. तसेच, उड्डाण पुलावर नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे या चौकातून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. चौकात पादचारी व प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी तसेच, स्टेशन व थांब्यांवर ये-जा करण्यासाठी सुरक्षित असा स्वतंत्र मार्ग नाही.

Nashik Phata Bridge Delay
PMRDA Fire Safety: पीएमआरडीए हद्दीत ६७४ गावांसाठी फक्त ३ अग्निशमन केंद्रे; १५० कोटींचा प्रकल्प रखडला

त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. त्यात अपघात होण्याचा धोका अधिक आहे. त्या ठिकाणी महामेट्रोकडून पादचारी पूल उभारण्यात येत आहे. वायएफसी-बीबीजी जेव्ही या ठेकेदाराकडून 1 जून 2025 पासून कामास सुरूवात केली आहे. त्यासाठी 20 कोटी 89 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. काम संथ गतीने सुरू आहे.

Nashik Phata Bridge Delay
Pimpri Illegal Gun Trade: मुलीच्या उपचारासाठी कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगाराचा पिस्तूल विक्रीचा धंदा; भोसरीत अटक

कामासाठी दररोज रात्री ग्रेडसेपरेटर तसेच, सर्व्हिस रस्ता बंद केला जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. ते काम वेगात पूर्ण करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांसह पादचार्‍यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news