

कात्रज (पुणे): शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रज परिसरात सकाळपासून आभाळ भरून आले होते. यामुळे आठच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक पहिल्या पावसाने सुखावले. कात्रज, सुखसागरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने अधूनमधून जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरून पाणी वाहिले. हवेत गारावा निर्माण झाल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून उन्हाच्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
हेही वाचा: