

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ukraine on Putin VS Wagner : रशिया-युक्रेन युद्धात लढणाऱ्या खासगी मिलिटरी वॅगनर गटाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात बंड केले आहे. या बंडानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रतिक्रिया येत आहे. युक्रेनही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. युक्रेन या बंडानंतर रशियाची खिल्ली उडवली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्सकी यांचे एक वरिष्ठ सहकारी मायखाइलो पोडोल्याक यांनी ही तर फक्त सुरुवात आहे, असे म्हणत रशियाची खिल्ली उडवली आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान आता रशियासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाकडून लढणाऱ्या खासगी मिलिटरी वॅगनर गटाने पुतिन यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. वॅगनर गटाने रशियन सैन्याच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार वॅगनॉर गटाने मुख्यालयासह अनेक शहरे ताब्यात घेतली आहे.
वॅगनर हा खासगी मिलिटरी समूह आहे. जो भाडेतत्वावर रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढत होता. या गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे आहेत. प्रिगोझिन यांनी रशियाच्या लष्करातील उच्चपदस्थ नेत्यांवर युक्रेनमधील युद्धात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी काही प्रक्षोभक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक केले होते. ज्यामध्ये त्यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांच्यावर युक्रेनमधील वॅगनरच्या फील्ड कॅम्पवर रॉकेट हल्ल्याचा आदेश दिल्याचा आरोप केला आहे. जिथे त्यांचे सैन्य रशियाच्या बाजून लढत आहे. रशियन सैन्य आणि वॅगनर गटात संघर्ष पेटला आहे.
झेलेन्स्कीचे वरिष्ठ सहाय्यक मायखाइलो पोडोल्याक म्हणाले की रशियामध्ये ही फक्त सुरुवात आहे. दोन्ही पक्षांपैकी एकाचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.
अधिकाऱ्याने सांगितले की या लढतीत प्रीगोझिन किंवा त्याच्या विरोधी संघाचा पराभव होईल. दोन वर्गांमध्ये स्पष्ट लढत असल्याचे ते म्हणाले. आता सर्व काही ठीक आहे किंवा चांगले होईल अशी बतावणी करून उपयोग नाही. कुणाचा तरी पराभव निश्चित आहे.
हे ही वाचा :